WTC Final: महामुकाबल्यात भारताने टॉस जिंकला, संघात एकाच स्पिनरला संधी, पाहा टीम

WTC Final 2023 IND vs AUS: कसोटी विश्वविजेतेपदाच्या सामन्यात भारताची प्रथम गोलंदाजी, रोहितसाठी विक्रमी सामना

By ऑनलाइन लोकमत | Published: June 7, 2023 02:34 PM2023-06-07T14:34:55+5:302023-06-07T14:38:23+5:30

whatsapp join usJoin us
ICC World Test Championship Final 2023 IND vs AUS Live Scorecard Day 1 Team India Playing XI Toss Update Rohit Sharma Virat Kohli Ravindra Jadeja | WTC Final: महामुकाबल्यात भारताने टॉस जिंकला, संघात एकाच स्पिनरला संधी, पाहा टीम

WTC Final: महामुकाबल्यात भारताने टॉस जिंकला, संघात एकाच स्पिनरला संधी, पाहा टीम

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

ICC World Test Championship Final 2023 IND vs AUS Live Scoreboard Day 1: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात इंग्लंडच्या ओव्हल मैदानात कसोटी विश्वविजेतेपदाचा सामना रंगला आहे. रोहित शर्माने नाणेफेक जिंकली आणि प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. भारताने चार वेगवान गोलंदाजांसह केवळ एक स्पिनर म्हणजेच रविंद्र जाडेजाला संघात घेतले. रविचंद्रन अश्विनला नाईलाजास्तव बाहेर ठेवावे लागल्याची खंत रोहितने व्यक्त केली. तसेच इशान किशनलाही संघाबाहेर ठेवण्यात आले आहे. पाहा संघ

WTC फायनलसाठी संघ- शुबमन गिल, रोहित शर्मा, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, एस भरत (विकेटकीपर), रविंद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, मोहम्मद सिराज, उमेश यादव, मोहम्मद शमी

ओव्हलच्या मैदानात जून महिन्यात पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय सामना खेळला जात आहे. खेळपट्टीवर गवत असल्याने वेगवान गोलंदाजांना याचा फायदा होईल असा अंदाज आहे. तर ढगाळ वातावरण असले तरी पहिल्या दोन-तीन तासांच्या खेळानंतर ऊन्हामुळे सामन्यावरचे पावसाचे ढग दूर होतील असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.

दोन्ही कर्णधारांचा ५०वा कसोटी सामना

आयसीसीच्या या मोठ्या स्पर्धेत रोहित शर्मा आणि पॅट कमिन्स हे दोघे मोठी आणि समान कामगिरी करत आहेत. भारत आणि ऑस्ट्रेलियाच्या कर्णधारांशी संबंधित हा विक्रम त्यांच्या कसोटी सामन्याशी संबंधित आहे. WTC अंतिम सामना रोहित आणि कमिन्स या दोघांच्या कारकिर्दीतील 50 वा कसोटी सामना असेल. असा पराक्रम एकाच सामन्यात घडण्याची बहुधा ही पहिलीच वेळ असेल.

हवामानाचा अंदाज

सामन्यादरम्यान हवामान पाहिल्यास सामना सुरू होईल त्या दिवशी हवामान स्वच्छ असेल आणि पावसाची शक्यता नाही. दुसऱ्या दिवशीही पावसाची शक्यता नाही. तिसऱ्या दिवशीही तापमानात किंचित वाढ होण्याची शक्यता आहे पण तरीही पावसाची भीती नाही. चौथ्या आणि पाचव्या दिवशी थोडीशी अडचण येऊ शकते. चौथ्या दिवशी हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच जोरदार वारे वाहण्याची शक्यता आहे. तर पाचव्या दिवशीही पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. या दिवशी 1.4 मिमी पर्यंत पाऊस पडू शकतो.

ICC World Test Championship Final 2023, WTC Final, WTC final 2023 Ind vs AUS, IND vs AUS Live Match, IND Vs AUS Live Test match, IND vs AUS Test Match Live, IND vs AUS Scorecard, IND vs AUS Live updates

Web Title: ICC World Test Championship Final 2023 IND vs AUS Live Scorecard Day 1 Team India Playing XI Toss Update Rohit Sharma Virat Kohli Ravindra Jadeja

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.