Join us  

WTC Final: "विराट कॅप्टन नसणं ही खरी ट्रॅजेडी, रोहितच्या संघात जिंकण्याची भूकच नाही"

WTC Final 2023 IND vs AUS: भारताच्या संघनिवडीवर चहुबाजूंनी टीका होताना दिसत्येय

By ऑनलाइन लोकमत | Published: June 08, 2023 3:13 PM

Open in App

Virat Kohli Rohit Sharma ICC World Test Championship Final 2023 IND vs AUS Live Scoreboard Day 1: इंग्लंडमधील ओव्हल मैदानावर खेळल्या जात असलेल्या जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारतीय संघाची अवस्था बिकट आहे. नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारणाऱ्या टीम इंडियाला पहिल्या दिवशी ऑस्ट्रेलियाच्या केवळ तीन विकेट्स काढता आल्या, तर कांगारूंनी ३२७ धावा केल्या. अनिल कपूरचा मुलगा आणि अभिनेता हर्षवर्धन कपूर पहिल्या दिवशीच्या टीम इंडियाच्या खराब कामगिरीवर टीका केली. हर्षवर्धन कपूरने ट्विटरवर कर्णधारापासून संघ निवडीपर्यंत प्रश्न उपस्थित केले.

संघ निवडीवरही प्रश्न

विराट कोहली आता कसोटी कर्णधार नाही, ही भयंकर शोकांतिका आहे, असे ट्विट त्याने केले आहे. तो म्हणाला की विराटशिवाय खेळाडूंमध्ये भूक आणि विजयाची इच्छाच दिसत नाही. हर्षवर्धन म्हणतो की खेळाडू निष्क्रिय झाले आहेत आणि फक्त रोहितच्या नेतृत्वाखाली हळूहळू खेळत आहेत. हर्षवर्धन कपूर खेळाबाबत खूप जागरूक आहे. तो अनेकदा फुटबॉल आणि क्रिकेटबद्दल बोलतो. त्याने अंतिम सामन्यात टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. हर्षवर्धन कपूर म्हणाला, संघ निवड योग्य नाही. अश्विन (रविचंद्रन अश्विन) खेळायला हवा होता आणि बुमराह (जसप्रीत बुमराह) दुखापतीमुळे बाहेर पडणे हा देखील संघासाठी मोठा धक्का आहे.

हर्षवर्धन कपूरच्या चित्रपटांबद्दल बोलायचे झाले तर, त्याने 2016 मध्ये मिर्झ्या या चित्रपटातून करिअरची सुरुवात केली होती. यानंतर तो भावेश जोशी सुपरहिरो आणि थर या चित्रपटात दिसला. त्यांचा कोणताही चित्रपट चित्रपटगृहात विशेष काही दाखवू शकला नाही. भावेश जोशी सुपरहिरोचे वर्णन अनेक समीक्षकांनी सर्वोत्कृष्ट चित्रपट म्हणून केले होते. तो अनिल कपूरसोबत थारमध्ये दिसला होता.

ICC World Test Championship Final 2023, WTC Final, WTC final 2023 Ind vs AUS, IND vs AUS Live Match, IND Vs AUS Live Test match, IND vs AUS Test Match Live, IND vs AUS Scorecard, IND vs AUS Live updates

टॅग्स :भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियारोहित शर्माविराट कोहलीअनिल कपूर
Open in App