WTC 2025-27 Points Table After Pakistan Won Against South Africa : पाकिस्तान आणि दक्षिण आफ्रिका दोन्ही संघांनी लाहोरच्या मैदानातील कसोटी सामन्यासह वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेच्या नव्या चक्राला सुरुवात केली. घरच्या मैदानात रंगलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेला ९३ धावांनी पराभूत करत पाकिस्तानच्या संघाने मोहिमेची सुरुवात विजयासह केली. पहिल्या सामन्यातील विजयासह पाकिस्तानच्या संघाने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप गुणतालिकेत थेट दुसऱ्या स्थानावर झेप घेतली आहे. याचा टीम इंडियाला फटका बसल्याचे दिसते.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
पाकिस्तानची थेट दुसऱ्या स्थानी झेप, श्रीलंकेसह टीम इंडियाला बसला फटका
पाकिस्तान आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील लाहोर कसोटी सामन्याच्या निकालानंतर ऑस्ट्रेलिया संघ आपले अव्वलस्थान टिकवून आहे. त्यापाठोपाठ आता थेट पाकिस्तान संघाचा नंबर लागतो. या बदलामुळे श्रीलंकेचा संघ एका स्थानांनी घसरून तिसऱ्या स्थानावर पोहचला असून भारतीय संघ तिसऱ्या स्थानावरून चाथ्या स्थानावर घसरला आहे.
वेस्ट इंडीजच्या नाकी नऊ आणणाऱ्या रवींद्र जडेजाची सचिन-सेहवागच्या विक्रमाशी बरोबरी!
फक्त एक सामना जिंकून पाकिस्तान संघ टॉप २ मध्ये कसा पोहचला?
पाकिस्तान आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील लढतीआधी भारतीय संघाने घरच्या मैदानातील वेस्ट इंडिज विरुद्धच्या दोन सामन्यांच्या कसोटी सामन्यात दिमाखदार विजय नोंदवला. पण कॅरेबियन संघाला क्लीन स्वीप दिल्यावरही टीम इंडिया तिसऱ्या क्रमांकावर जैसे थे होती. WTC गुणतालिकेत भारताच्या खात्यात सर्वाधिक ५२ गुण आहेत. पण पाकिस्तानचा संघ एक सामना जिंकून थेट टॉप २ मध्ये पोहचल्याचे दिसते. कारण गुणतालिकेतील निकष हा गुण नव्हे तर सामन्यातील विजयाची टक्केवारीवर ठरतो. पहिल्या सामन्यातील पहिल्या विजयासह पाकिस्तानच्या संघाने १०० टक्के विनिंग पर्सेंटेजच्या जोरावर श्रीलंकेसह भारतीय संघाला मागे टाकल्याचे दिसते.
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप गुणतालिकेत कोणता संघ कितव्या स्थानी?
क्रमांक | संघ | सामने | जिंकले | हरले | बरोबरी | कपात गुण (Ded) | गुण | विजयाची टक्केवारी |
---|
१ | ऑस्ट्रेलिया (AUS) | ३ | ३ | ० | ० | ० | ३६ | १००.०० |
२ | पाकिस्तान (PAK) | १ | १ | ० | ० | ० | १२ | १००.०० |
३ | श्रीलंका (SL) | २ | १ | ० | १ | ० | १६ | ६६.६७ |
४ | भारत (IND) | ७ | ४ | २ | १ | ० | ५२ | ६१.९० |
५ | इंग्लंड (ENG) | ५ | २ | २ | १ | २ | २६ | ४३.३३ |
६ | बांगलादेश (BAN) | २ | ० | १ | १ | ० | ४ | १६.६७ |
७ | दक्षिण आफ्रिका (SA) | १ | ० | १ | ० | ० | ० | ०.०० |
८ | वेस्ट इंडीज (WI) | ५ | ० | ५ | ० | ० | ० | ०.०० |
९ | न्यूझीलंड (NZ) | ० | ० | ० | ० | ० | ० | ०.०० |