ICC World Cup 2023: BCCI हे मुद्दाम करतेय; अफगाणिस्तानविरुद्ध चेन्नईत मॅच ठेवल्याने पाकिस्तान घाबरले

ICC World Cup 2023: भारतात ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात होणाऱ्या वन डे वर्ल्ड कप स्पर्धेसाठी BCCI ने आयसीसीकडे वेळापत्रकाचा ड्राफ्ट पाठवल्याची चर्चा आहे

By ऑनलाइन लोकमत | Published: June 17, 2023 06:02 PM2023-06-17T18:02:57+5:302023-06-17T18:14:19+5:30

whatsapp join usJoin us
ICC World Cup 2023: Pakistan want their match against Afghanistan to be taken out of Chennai,They want to play Australia at Chennai and Afghanistan at Bengaluru | ICC World Cup 2023: BCCI हे मुद्दाम करतेय; अफगाणिस्तानविरुद्ध चेन्नईत मॅच ठेवल्याने पाकिस्तान घाबरले

ICC World Cup 2023: BCCI हे मुद्दाम करतेय; अफगाणिस्तानविरुद्ध चेन्नईत मॅच ठेवल्याने पाकिस्तान घाबरले

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

ICC World Cup 2023: भारतात ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात होणाऱ्या वन डे वर्ल्ड कप स्पर्धेसाठी BCCI ने आयसीसीकडे वेळापत्रकाचा ड्राफ्ट पाठवल्याची चर्चा आहे. या ड्राफ्टनुसार भारत-पाकिस्तान हा महामुकाबला १५ ऑक्टोबरला अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे. लीग टप्प्यात पाकिस्तान पाच ठिकाणी खेळणार आहे. अहमदाबादमधील भारताच्या सामन्याव्यतिरिक्त, हैदराबादमध्ये चेन्नई, बंगळुरू आणि कोलकाता येथे खेळणार आहे. 


सुरुवातीला नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारताविरुद्ध सामना खेळण्यास नकार देणाऱ्या पाकिस्तानला आता चेन्नईत अफगाणिस्तानविरुद्ध खेळण्यासही हरकत आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने ( PCB ) हा सामना बंगळुरू येथे खेळवावा आणि ऑस्ट्रेलियाविरुद्धचा सामना चेन्नईत खेळवावा अशी मागणी केली आहे. अफगाणिस्तानच्या संघात अव्वल दर्जाचे फिरकीपटू आहेत आणि चेन्नईची खेळपट्टी ही फिरकीपटूंसाठी पोषक असल्याने पाकिस्तानला धडकी भरली आहे. BCCI ने मुद्दाम अफगाणिस्ताविरुद्धचा सामना चेन्नईत ठेवल्याचा आरोप PCB कडून केला जात आहे. 


पाकिस्तान ६ आणि १२ ऑक्टोबर रोजी क्वालिफायरमधून प्रगती करणाऱ्या दोन संघांविरुद्ध आणि त्यानंतर ऑस्ट्रेलिया ( २० ऑक्टोबर, बंगळुरू), अफगाणिस्तान ( २३ ऑक्टोबर) आणि दक्षिण आफ्रिका ( २७ ऑक्टोबर) यांच्याविरुद्ध चेन्नईत सामना होईल. बांगलादेश (३१ ऑक्टोबर, कोलकाता), न्यूझीलंड ( ५ नोव्हेंबर, बंगळुरू) आणि इंग्लंड ( १२ नोव्हेंबर, कोलकाता) येथे पाकिस्तानचे सामने होतील. आयसीसीने अद्याप वर्ल्ड कपचे वेळापत्रक जाहीर केलेले नाही.   


तीन सामन्यांवर पाकिस्तानचा आक्षेप
भारत वि. पाकिस्तान, अहमदाबाद
पाकिस्तान वि. अफगाणिस्तान, चेन्नई
पाकिस्तान वि. ऑस्ट्रेलिया, बंगळुरू
 

Web Title: ICC World Cup 2023: Pakistan want their match against Afghanistan to be taken out of Chennai,They want to play Australia at Chennai and Afghanistan at Bengaluru

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.