- बाळकृष्ण परब अखेर जे न व्हायचे तेच झाले. अघटित घटले. क्षणात होत्याचे नव्हते झाले अन् आयसीसी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेतील भारतीय संघाचे आव्हान संपुष्टात आले. विराटसेनेसह विश्वचषकाला गवसणी घालू पाहणाऱ्या कोट्यवधी क्रिकेटप्रेमींचे स्वप्न भंगले. संपूर्ण स्पर्धेत अनेक कठीण पेपर अचूक सोडवणाऱ्यांकडून अगदी मोक्याच्या क्षणी काही गंभीर चुका झाल्या. त्यामुळे अगदी दोन पावलांवर आलेले विश्वविजेतेपद निसटले.या स्पर्धेच्या सुरुवातीपासूनच आपला संघ विजेतेपदासाठी फेवरिट होता. रोहित शर्मा, विराट कोहलीसारखे दिग्गज फलंदाज, जसप्रीत बुमराह आणि भुवनेश्वरसारखे गोलंदाज, हार्दिक पांड्यासारखा अष्टपैलू आणि धोनीसारखा अनुभवी चतुर यष्टीरक्षक दिमतीला असल्याने क्रिकेटप्रेमींनाही या संघाकडून तशाच कामगिरीची अपेक्षा होती. आपल्या संघानेही प्राथमिक फेरीत एकापेक्षा एक धडाकेबाज विजय मिळवत अपेक्षा उंचावल्या होत्या. अगदी न्यूझीलंडविरुद्धच्या उपांत्य फेरीतील पहिल्या डावापर्यंत सारे काही सुरळीत चालले होते. पण फलंदाजीला सुरुवात झाली आणि पहिल्या अर्ध्या-पाऊण तासातच होत्याचे नव्हते झाले. खरं सांगायचं तर न्यूझीलंडला सहज नमवू हा अतिआत्मविश्वास आपल्या संघाला नडला.
- Cricket Buzz»
- बातम्या»
- ICC World Cup 2019 : अतिआत्मविश्वासाने घात केला, हातचा वर्ल्डकप निसटून गेला!
ICC World Cup 2019 : अतिआत्मविश्वासाने घात केला, हातचा वर्ल्डकप निसटून गेला!
संपूर्ण स्पर्धेत अनेक कठीण पेपर अचूक सोडवणाऱ्यांकडून अगदी मोक्याच्या क्षणी काही गंभीर चुका झाल्या. त्यामुळे अगदी दोन पावलांवर आलेले विश्वविजेतेपद निसटले.
By बाळकृष्ण परब | Updated: July 11, 2019 18:37 IST