Join us  

ICC World Cup 2019: कोण जिंकणार विश्वचषक... जाणून घ्या क्रिकेट विश्वचषकाचे अंकशास्त्र

भारत तिसऱ्यादा विश्वविजेता होईल का??

By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2019 10:59 PM

Open in App

अभिजित देशमुख : भारताने ऑलिंपिक मध्ये वैयक्तिक पदके बरीच जिंकली आहे पण १९८० च्या मॉस्को ऑलिंपिक मधील हॉकी सुवर्ण पदकानंतर एकही सांघिक खेळामध्ये वर्चस्व गाजवता आले नाही. क्रिकेट वगळता एकही प्रशंसनीय सांघिक खेळामध्ये भारताने विश्वचषक जिंकला नाही. १९८३ असो किंवा २०११, भारताने विश्वचषक जिंकल्यामुळे देशाचा गौरव तर वाढलाच पण त्यापेक्षाही काही अविस्मरणीय शण या देशाला लाभले आहे. त्यामुळे क्रिकेट हा खेळ नसून अनेक भारतीयांचा आयुष्यातील महत्वाचा भाग झाला आहे. कर्णधार विराट कोहली असो किंवा बॅट बनवणारी फॅक्टरी मधील कामगार, रणजी सामान्य मधील अंपायर असो किंवा आयपील वेळी स्टेडियम चा बाहेर टीशर्ट विकणारा व्यक्ती, हा खेळ लाखो लोकांचे जीवन झाला आहे. विश्वकप दरम्यान उत्साह शिगेला असतो आणि आपला संघ कुठपर्यंत मजा मारेल याची उत्सुकता सगळ्यांनाच असती. बरीचशी मंडळी आपल्या देशाने विश्वकप जिंकावा म्हणून होम-हवन करतात तर काही ज्योतिषशास्त्र, अंकशास्त्र द्वारे आपल्या प्रश्नांचे उत्तरे शोधतात. विश्वकप जवळपास अर्धा संपला आहे, भारत, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड सर्वात शक्तिशाली संघ दिसत आहे पण अंकगणित प्रमाणे विजेता नवीन असल्याचे संकेत मिळत आहे. 

विश्वचषकची अंतिम सामन्यातील तारीख:- पहिल्यांदाच, विश्वचषकचा अंतिम सामना (१४ जुलै २०१९) रोजी लॉर्ड्सवर जुलै महिन्यात होणार आहे. अंतिम सामन्याची तारीख मधील सर्व अंक जोडले तर ६ असा एकेरी अंक निघतो (७+७+२०१९=२०४०=२+०+४+०=६). आधीच्या सर्व विश्वचषक अंतिम सामन्याच्या एकेरी अंक, ६ कधीच नव्हते. हे नवीन विश्वविजेतेचे चिन्ह आहे, याचा अर्थ मागील विश्वचषक विजेत्यांना पुन्हा ट्रॉफी उंचावण्याची शक्यता कमी आहे.कर्णधारांची जन्मतारीख: -सांघिक खेळामध्ये कर्णधारवर बरेचकाही अवलूंबून असते, त्यामुळे त्याचा जन्मतारीखेचा एकेरी अंक संपूर्ण संघाचे प्रतिनिधित्व करतो. वेस्टइंडीसचा माजी कर्णधार क्लाईव्ह ल्योडची जन्मतारीख ३१ ऑगस्ट १९४४ आहे, त्याचा एकेरी अंक ३ आहे. त्याने २१ जुन १९७५ (एकेरी अंक-४) आणि २३ जून १९७९ (एकेरी अंक-१) मध्ये विश्वचषक उचलला. तसेच माजी भारतीय कर्णधार कपिल देवचा एकेरी अंक ४ आहे, त्याने २५ जून १९८३ (एकेरी अंक-७) रोजी विश्वचषक उचलला. महिंद्रसिंग धोनीचा एकेरी अंक ६ आहे, त्याने २ एप्रिल २०११ (एकेरी अंक -१) या दिवशी जिंकला. त्यामुळे असा निष्कर्ष काढला की विश्वचषकची अंतिम तारीख मधील सर्व अंक जोडल्यानंतर मिळवलेली एकेरी अंक आणि विजेता कर्णधारची जन्मतारीख मधील सर्व अंक जोडल्यानंतर मिळविलेली एकेरी अंक कधीही "समान" नसतीत. बाकी सर्व विश्वचषकची अंतिम तारीखचा एकेरी अंक आणि विजेता कर्णधारची एकेरी अंक सामान नाहीत. 

श्रीलंका, दक्षिण अफ्रिका आणि अफगाणिस्तानचा अंदाज: -२०१९ विश्वचषकाची अंतिम तारखेचा एकेरी अंक 6 आहे. दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार फाफ डुप्लेसिस (१३ जुलै १९८४) आणि श्रीलंकेचा कर्णधार दिमथ करुणारत्न (२१ एप्रिल १९८८) यांचा एकेरी अंक 6 आहे, त्यामुळे त्यांना विश्व कप उचलण्याची संधी शक्य नाही. अफगाणिस्तान कमकुवत संघ आहे पण यंदाच्या विश्वचषकामधील सर्व कर्णधार पैकी, सहा पेक्षा कमी एकेरी अंक असणारा फक्त अफगाणिस्तानचा कर्णधार गुलबबादीन नाईबचा आहे. त्याचा जन्म १६ मार्च १९९१ असून एकेरी अंक ५ आहे, त्यामुळे बाकी सर्व कर्णधार त्याचा पेक्षा शक्तिशाली आहे.

वेस्टइंडीज आणि पाकिस्तानचे गणित:-वेस्ट इंडिजचा कर्णधार जेसन होल्डर चा जन्म ५ नोव्हेंबर १९९१ असून एकेरी अंक ९ आहे. वेस्टइंडिज ने केवळ जून महिन्यामध्ये इंग्लंड येथे वर्ल्ड कप पटकवला आहे. यावेळी वर्ल्ड कप फायनल जुलै महिन्यामध्ये आहे, त्यामुळे त्यांना विश्वचषक जिंकणं कठीण जाणार आहे. पाकिस्तान कुठल्याही दिवशी बलाढ्य संघाला आश्चर्यचकित करू शकतो, परंतु उपांत्य फेरीत पहुचने त्यांच्यासाठी कठीण होईल. सरफराज अहमद चा एकेरी अंक 7 आहे, पाकिस्तानला जून महिनाचा अंतिम सामना नशीबवान आहे. २०१७ मध्ये त्यांनी आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी इंग्लंडमध्ये जिंकली होती, तसेच २००९ चा टी-२० वर्ल्ड कप फायनल सुद्धा जुन मधेच होता त्यावेळी पाकिस्तान ने श्रीलंकाला नमवले होते. पण यंदा अंतिम सामना जुलै मध्ये असल्यामुळे त्यांना विश्वकप जिंकणे शक्य नाही.

बांगलादेश आणि न्यूझीलंडसाठी उत्तम वर्ल्ड कप:- या वेळी जुलै महिन्या मध्ये फायनल असल्यामुळे नवीन विजेताची संभावना जास्त आहे. बांगलादेशच्या कर्णधार मुशर्रफ मोर्तझा आणि न्यूझीलंड चा कर्णधार केन विलिमसन चा एकेरी अंक ९ आहे. फायनल चा एकेरी अंक ६ आहे आणि ९ अंक त्याचा मित्र आहे. बांगलादेश बऱ्याच वर्षांपासून उत्तम खेळत आहे, २०१७ च्या आयसीसी चॅम्पिअन्स ट्रॉफी मध्ये त्यांनी उपांत्य फेरी गाठली होती. बांगलादेशला नशिबाची साथ भेटण्याची शक्यता खूप आहे, एका बलाढ्य संघ विरुद्ध पावसाने हजेरी लावल्याने त्यांना एक अमूल्य गुण भेटू शकते ज्याने करून उपांत्य फेरीचे दार उघडले जाऊ शकतात. बांगलादेशने उपांत्य फेरीत प्रवेश नाही मिळवला तरीही त्यांची आतापर्यंतची सर्वच कामगिरी असेल. न्यूझीलंड संघ बलाढ्य आहे, २०१५ वर्ल्ड कप चे उपविजेते सुद्धा आहे आणि पहिल्या चारही सामान्य मध्ये विजय मिळवला आहे. नवीन विजेताची शक्यता असल्यामुळे न्यूझीलंड नक्कीच प्रबळ दावेदार आहे, उपांत्य फेरी नक्की गाठेल. उपांत्य फेरीत एका माजी विजेताशी गाठ झाली तर तेथे फायदा होऊ शकतो. फायनल मध्ये सुद्धा स्थान मिळवता येईल अशी शक्यता आहे. ऑस्ट्रेलियाचे विजेतेपद धोक्यात:-ऑस्ट्रेलियाने पाच वेळा विश्वचषक जिंकला आहे आणि जिंकलेल्या सर्व तारीखच्या एकेरी अंकचा एक विशेष अनुक्रमन लक्षात येत आहे. १९८७ विश्वकप मधील एकेरी अंक-८ (सम), १९९९ मधील ९ (विषम), २००३ मध्ये ४ (सम), २००७ मध्ये ५ (विषम), २०१५ मध्ये ४ (सम). ऑस्ट्रेलियाने विश्वकप सम आणि विषम या अनुक्रमाने जिंकला आहे. २०१९ चा विश्वकप चा एकेरी अंक ६ आहे आणि वरील अनुक्रमाने त्यांचा पुढचा विश्वकप विषम या एकेरी अंक वर लाभेल. तसंही नवीन विजेताची शक्यता जास्त आहे, त्यामुळे यंदा कांगारू च्या पदरात विश्वचषक पडण्याची शक्यता कमी आहे. पण याचा अर्थ असा नाहीकी ऑस्ट्रेलिया उपांत्य किंवा फायनल गाठू शकत नाही. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार आरोन फिंच चा एकेरी अंक ७ आहे आणि त्याला साथीदार कडून उत्तम साथ लाभेल. ऑस्ट्रेलिया ने उपांत्य सामन्यात कधीही हार पत्करली नाहीये त्यामुळे जर उपांत्य फेरीत प्रवेश म्हणजे जवळ जवळ अंतिम फेरीत प्रवेश.

भारत तिसऱ्यादा विश्वविजेता होईल का??- २५ जून १९८३ रोजी एकेरी अंक-७, कपिल देवने (एकेरी अंक-४) भारताचा पहिला विश्वचषक उचलला. २०१३ ची आयसीसी चॅम्पिअनस ट्रॉफी भारताने २३ जूनला जिंकली होती. त्यामुळे भारताला इंग्लंड आणि जून महिना आणि विषम अंक नशीबवान आहे. २००३ विश्वचषकचा अंतिम सामन्याचा एकेरी अंक ४ (सम) होता त्यामुळे भारतालाती लाभली नाही. २०१७ ची आयसीसी चॅम्पिअनस ट्रॉफीचा अंतिम सामना १८ जून (सम) असल्यामुळे भारताने तो गमवला. या वेळी अंतिम सामना जुलै मध्ये असल्यामुळे विश्वचषक जिंकण्याचे शक्यता थोडी ढासळत आहे. २ एप्रिल २०११ रोजी (एकेरी अंक -१) महिंद्रसिंघ धोनी (एकेरी अंक-६) भारतला दुसऱ्यांदा विश्वचषकची गवसणी घातली. दोन्ही वेळा भारताने जेव्हा विश्वकप जिंकले तेव्हा कपिल देव आणि धोनीची एकेरी अंक आणि अंतिम सामन्याचे एकेरी अंक समान नव्हते. २०१९ विश्वचषक फायनलचा एकेरी अंक ६ आहे आणि कर्णधार विराट कोहलीचा जन्म ५ नोव्हेंबर १९८८ एकेरी अंक सुद्धा ६ आहे. भारतासाठी जून महिना उत्तम राहील पण जुलै महिना खडतर असेल, त्यामुळे हा वर्ल्ड कप भारताला जिंकणे खूप अवघड असेल. भारत उपांत्य फेरी नक्कीच गाठेल पण तिथून खडतर रास्ता असेल. उपांत्य फेरीत भारताची जर माजी विजेता सोबत सामना झाला तर विजयची शक्यता जास्त आहे. 

पावसाची साथ लाभली तर…. भारताने जर १४ जुलै २०१९ ला अंतिम सामन्यात प्रवेश केला आणि गाठ एकदाही विजेता नसलेल्या संघा विरुद्ध झाली तर आव्हान खूप मोठे असेल. परंतु जर भरपूर पाऊस झाला आणि सामना पुढच्या दिवशी म्हणजे १५ जुलैला ढकला गेला तर भारताचे पारडे जाड होतील. १५ जुलै २०१९ चा एकेरी अंक ७ आहे, भारताने अतापर्यंत विषम याच एकेरी अंक असलेल्या दिवशी विजेतेपद पटकवले आहे. एक शक्यता अशी पण आहे कि, विराट कोहली ऐवजी रोहित शर्मा जर कर्णधार झाला तर चित्र पलटून जाईल. रोहित शर्मा ला सध्या गुरूचा प्रचंड लाभ भेटत आहे, त्याने या वर्षी मुंबई इंडियन्स कर्णधार म्हणून आयपील जिंकले. विश्वकप मध्ये तो सर्वोत्तम राहणार आहे, या विश्वचषकानंतर रोहित शर्माचे टीकाकार त्याचे चाहते बनणार आहे. त्यांची जन्मतारीख ३० एप्रिल १९८७ असून एकेरी अंक ५ आहे आणि त्याचा नेतृत्व आणि कर्मामुळे भारताला विश्वचषक जिंकता येईल.

मातृभूमी चे आशीर्वाद इंग्लंडला लाभेल??अंकशास्त्रानुसार इंग्लंडला विश्वचषक उचलण्याची शक्यता अधिक आहे. इंग्लंडचा संघ बलाढ्य आहे आणि नवीन विजेता भेटण्याची शक्यता जास्त असल्यामुळे त्यांचे पारडे जड असणार आहे. इंग्लंडचा कर्णधार इऑन मॉर्गन चा एकेरी अंक ७ आहे. इंग्लंड उपांत्य फेरी नक्की गाठेल आणि अंतिम सामना सुद्धा गाठण्याचे शक्यता जास्त आहे. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे यजमान संघला आपल्या मातृभूमी वर खेळण्याचा फायदा पाहायला भेटला आहे. शेवटचे दोन्ही विजेते ऑस्ट्रेलिया आणि भारतने आपल्या मातृभूमी वरच विश्वचषक जिंकले. क्रिकेट चे शोधक इंग्लंड ने अतापर्यंत एकदाही विश्वचषक जिंकला नाही आणि त्यांना याचा पेक्षा उत्तम संधी भेटणार नाही, याची जाणीव आहे. विश्वचषकचा काही दिवसापूर्वी इंग्लंडने जोफरा आर्चर ला घेऊन एक हुक्कमचा एक्का आपल्या संघात घेतला आहे. अंतिम सामन्यात कर्णधार मॉर्गन आणि आर्चरचा इंग्लंड संघला विश्वचषक जिंकून देण्यात मोलाचे वाटा असेल.

टॅग्स :वर्ल्ड कप 2019भारतीय क्रिकेट संघ