Join us

ICC World Cup 2019 : पहिल्याच सामन्यात पाकिस्तानचा डब्बा गुल, वेस्ट इंडिजचा सहज विजय

ख्रिस गेलच्या अर्धशतकाच्या जोरावर त्यांनी हे आव्हान सात विकेट्स आणि २१८ चेंडू राखून पूर्ण केले.

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2019 18:27 IST

Open in App

लंडन, आयसीसी वर्ल्ड कप 2019 : विश्वचषकातील पहिल्याच सामन्यात पाकिस्तानला मानहानीकारक पराभव स्वीकारावा लागला. वेस्ट इंडिजच्या गोलंदाजांनी भेदक मारा करत पाकिस्तानला 105 धावांच सर्वबाद केले. त्यानंतर ख्रिस गेलच्या अर्धशतकाच्या जोरावर त्यांनी हे आव्हान सात विकेट्स आणि २१८ चेंडू राखून पूर्ण केले.

पाकिस्तानचा विश्वचषकातील पहिल्याच सामन्यात वेस्ट इंडिजने धुव्वा उडवल्याचे पाहायला मिळाले. वेस्ट इंडिजच्या गोलंदाजांनी भेदक गोलंदाजी करत पाकिस्तानचा 105 धावांत खुर्दा उडवला. पाकिस्तानच्या फक्त चार फलंदाजांनाच दोन अंकी धावसंख्या उभारता आली.

नॉटिंगहॅमच्या खेळपट्टीवर वेस्ट इंडिजने नाणेफेक जिंकत प्रथम पाकिस्तानला फलंदाजीसाठी पाचारण ठरले. वेस्ट इंडिजच्या कर्णधाराचा हा निर्णय त्यांच्या गोलंदाजांनी योग्य असल्याचे सामन्याच्या सुरुवातीपासूनच दाखवून दिले. वेस्ट इंडिजच्या गोलंदाजांनी अचूक आणि भेदक मारा करत पाकिस्तानच्या गोलंदाजांना आपल्या तालावर नाचवले.

तिसऱ्याच षटकात इमाम उल हकच्या रुपात पाकिस्तानला पहिला धक्का बसला. त्यानंतर फखर झमान आणि बाबर आझम यांनी प्रत्येकी २२ धावा करत संघाला सारवण्याचा प्रयत्न केला. पण यामध्ये ते अपयशी ठरले. आंद्रे रसेलने फखर झमानला क्लीन बोल्ड करत ही जोडी फोडली आणि त्यानंतर पाकिस्तानचा डाव गडगडला. 

पाकिस्तानने विश्वचषकापूर्वी इंग्लंडबरोबर एकदिवसीय मालिका खेळली होती. या मालिकेतही त्यांना सपाटून मार खावा लागला होता.

टॅग्स :वर्ल्ड कप 2019पाकिस्तान