ICC World Cup 2019: विराटने टाकलं रोहितला पिछाडीवर; पण कसं काय, जाणून घ्या...

रोहितला विराटने नेमकं कोणत्या बाबतीत पिछाडीवर टाकलं आहे, याचा विचार तुम्ही करत असाल...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2019 18:09 IST2019-07-07T18:07:28+5:302019-07-07T18:09:43+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
ICC World Cup 2019: Virat Kohli ahead Rohit sharma; But how... | ICC World Cup 2019: विराटने टाकलं रोहितला पिछाडीवर; पण कसं काय, जाणून घ्या...

ICC World Cup 2019: विराटने टाकलं रोहितला पिछाडीवर; पण कसं काय, जाणून घ्या...

लंडन, आयसीसीवर्ल्ड कप 2019 : विश्वचषकात सध्याच्या घडीला सर्वात फॉर्मात आहे तो भारताचा सलामीवीर रोहित शर्मा. आतापर्यंत रोहितने विश्वचषकात पाच शतके लगावली आहेत. त्याचबरोबर विश्वचषकातील सर्वाधिक धावांच्या यादीमध्ये रोहित हा अव्वल स्थानावर विराजमान आहे. पण मग रोहितला विराटने नेमकं कोणत्या बाबतीत पिछाडीवर टाकलं आहे, याचा विचार तुम्ही करत असाल...

विश्वचषकात पाचवे ऐतिहासिक शतक रचले ते भारताचा सलामीवीर रोहित शर्माने. श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात रोहितने दमदार शतक झळकावले. रोहितचे हे या विश्वचषकातील पाचवे शतक ठरले. विश्वचषकात पाच शतक झळकावणारा रोहित हा पहिलाच फलंदाज ठरला आहे. रोहितने यावेळी श्रीलंकेच्या कुमार संगकाराचा विश्वविक्रम मोडीत काढला आहे. संगकाराने २०१५च्या विश्वचषकात चार शतके लगावली होती. 

श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात अर्धशतक झळकावत भारताचा सलामीवीर रोहित शर्मा पुन्हा एकदा अव्वल ठरला आहे. आता या सामन्यातही शतक झळकावत रोहित क्रिकेट विश्वातील इतिहासाला गवसणी घालणार का, याकडे साऱ्यांचे लक्ष लागून राहिलेले आहे.

आयसीसीने आज एकदिवसीय क्रमवारी जाहीर केली आहे. या क्रमवारीत रोहितला मागे टाकत विराटने अव्वल स्थान पटकावले आहे. विराट 891 गुणांसह क्रमवारीत अव्वल स्थानावर आहे. या क्रमवारीत रोहित दुसऱ्या स्थानावर आहे. रोहितच्या खात्यात 885 गुण आहेत.


वर्ल्ड कपनंतर 'हे' दोन सदस्य टीम इंडियाची साथ सोडणार, कारण?
भारतीय संघाचे फिटनेस ट्रेनर शंकर बसु आणि फिजिओ पॅट्रिक फारहार्ट यांनी वर्ल्ड कपनंतर संघासोबत नव्यानं करार न करण्याचा निर्णय घेतला आहे. तशी कल्पना त्यांनी भारतीय क्रिकेट नियामक मंडळालाही दिली आहे. बीसीसीआयनं करारात वाढ करण्याचा प्रस्ताव त्यांना दिला होता, परंतु दोघांनीही तो अमान्य केल्याचे, वृत्त आहे. इंडियन एक्स्प्रेसने दिलेल्या वृत्तानुसार, बीसीसीआयच्या अधिकाऱ्याने सांगितले की,''फिटनेस ट्रेनर म्हणून यापुढे संघासोबत काम न करण्याचे बसु यांनी संघ व्यवस्थापनाला सांगितले आहे. त्यांना विश्रांतीची आवश्यकता आहे. पॅट्रीक यांनीही हिच भूमिका घेतली आहे. वर्ल्ड कप आणि वेस्ट इंडिज मालिकेनंतर त्यांच्या रिप्लेसमेंटचा विचार केला जाईल.''

भारतीय खेळाडूंच्या तंदुरूस्तीचा स्तर उंचावण्यामागे या दोघांची महत्त्वाची भूमिका आहे. शंकर बसु यांनीच यो-यो टेस्ट अनिवार्य केले होते. विराट कोहलीच्या फिटनेसचे श्रेय बसु यांनाच जाते आणि कोहलीनंही ते कबुल केले आहे. कोहली म्हणाला होता की,'' मैदानावरील माझी ऊर्जा आणि शारीरिक परिवर्तनामागे बसु आहेत. त्यांनी मला फिटनेस संदर्भात बरेच काही शिकवलं.'' 

Web Title: ICC World Cup 2019: Virat Kohli ahead Rohit sharma; But how...