लंडन, आयसीसी वर्ल्ड कप 2019 : क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे, असे सर्वांनाच माहिती आहे. पण विश्वचषकात असे नेमके काय घडले की, खेळाडूंसह पंचांवरही मैदानात झोपण्याची पाळी आली. पण असे नेमके घडले तरी काय, ते जाणून घ्या...
विश्वचषक हा चार वर्षांतून एकदा खेळवला जातो. विश्वचषकात सर्व संघांचे आणि पंचांची चोख व्यवस्था करण्यात येते. हा विश्वचषक इंग्लंडमध्ये खेळवला जात आहे. पण या विश्वचषकाच्या आयोजनावर बरेच जण नाराज आहेत. सध्याच्या घडीला इंग्लंडमध्ये विश्वचषकासाठी जसे वातावरण असते, तसे नसल्याचे म्हटले जाते. विश्वचषकाचे चांगले मार्केटींग करण्यात आले नसल्याचे बोलले जाते. त्याचबरोबर पावसामुळे सामने वाहून गेल्यानेही चाहते नाराज आहेत. पण खेळाडू आणि पंचांवर मैदानात झोपण्याची पाळी आली तरी का, याची उत्सुकता तुम्हाला असेल.

शुक्रवारी विश्वचषकात दक्षिण आफ्रिका आणि श्रीलंका यांच्यामध्ये सामना झाला होता. या सामन्यात ही गोष्ट पाहायला मिळाली. या सामन्यात श्रीलंकेचा संघ प्रथम फलंदाजी करत होता. त्यावेळी ही घटना घडल्याचे पाहायला मिळाले. श्रीलंकेचा डाव समाप्तीकडे येत असताना हा प्रकार घडल्याचे पाहायला मिळाले.

श्रीलंकेच्या डावातील 48वे षटकात ही गोष्ट पाहायला मिळाली. हे षटक दक्षिण आफ्रिकेचा ख्रिस मॉरिस टाकत होता. या षटकातील पाच चेंडू झाले आणि त्यानंतर मैदानामध्ये मधमाश्यांचा थवा दाखल झाला. या थव्यामध्ये एवढ्या मधमाश्या होत्या की, त्यामुळे खेळ थांबवावा लागला. या मधमाश्या आपल्याला चावू नयेत, यामुळे खेळाडूंसह पंचही मैदानात झोपल्याचे पाहायला मिळाले.
फॅफ आणि धोनीसह तीन कर्णधारांच्या नावावर आहे 'हा' अनोखा विक्रम
शुक्रवारी विश्वचषकात दक्षिण आफ्रिका आणि श्रीलंका यांच्यामध्ये सामना झाला होता. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार फॅफ ड्यू एक विक्रम आपल्या नावावर केला. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने श्रीलंकेवर विजय मिळवला. या विजयात फॅफचा महत्वाचा वाटा होता. कारण फॅफने नाबाद 96 धावांची खेळी साकारली होती. या त्याच्या नाबाद 96 धावांच्या खेळीच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेने विजय मिळवला होता. नव्वदीमध्ये नाबाद राहीलेला फॅफ हा विश्वचषकातील तिसरा कर्णधार ठरला आहे.
यापूर्वी 1996 साली झालेल्या विश्वचषकात वेस्ट इंडिजचे माजी कर्णधार रिची रीचर्ड्सन यांच्या नावावर हा विक्रम पहिल्यांदा नोंदवला गेला. 1996 साली झालेल्या विश्वचषकात रीचर्ड्सन हे नाबाद 93 धावांची खेळी साकारून माघारी परतले होते.
धोनीच्या बाबतीत हा विक्रम नोंदवला गेला तो 2011 साली झालेल्या विश्वचषकाच्या अंतिम फेरीत धोनीने श्रीलंकेविरुद्ध झालेल्या अंतिम फेरीत नाबाद 91 धावांची खेळी साकारली होती. धोनी या सामन्यात नव्वदी गाठेल, असे बऱ्याच जणांना वाटले नव्हते. पण धोनीने षटकार लगावत भारताच्या विश्वविजयावर शिक्कामोर्तब केले. या षटकारासह धोनीने नव्वदीमध्ये प्रवेश करत भारताला विश्वचषक जिंकवून दिला होता.