- ललित झांबरे
मँचेस्टर: विश्वचषक स्पर्धेत पुन्हा एकदा भारतीय संघ पाकिस्तानला नेमका 'फादर्स डे'च्या दिवशी भारी पडला. विश्वचषकात पाकिस्तानविरुध्दच्या सात सामन्यांतला भारताचा हा सातवा विजय म्हणजे पैकीच्या पैकी असे शंभर टक्के यश.
अशा पैकीच्या पैकी यशात सर्वाधिक विश्वचषक सामने विजयात भारत आता योगायोगाने पाकिस्तानच्याच बरोबरीने आहे. पाकिस्ताननेही विश्वचषकातील श्रीलंकेविरुध्दचे सातपैकी सात सामने जिंकले आहेत.
100 टक्के यशस्वी संघ
विजयी अंतर पराभूत
भारत 7-0 पाकिस्तान
पाकिस्तान 7-0 श्रीलंका
वेस्ट इंडिज 6-0 झिम्बाब्वे
न्यूझीलंड 5-0 बांगलादेश
श्रीलंका 5-0 झिम्बाब्वे
भारत 4-0 केनिया
ऑस्ट्रेलिया 3-0 केनिया
ऑस्ट्रेलिया 3-0 स्कॉटलंड
इंग्लंड 3-0 नेदरलँड
न्यूझीलंड 3-0 कॅनडा