ICC World Cup 2019 : टीम इंडियाची लंडन सफारी, पाहा खास फोटो

भारतीय संघातील खेळाडू यावेळी जंगलासारख्या परिसरामध्ये दिसत आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2019 21:35 IST2019-05-31T21:33:23+5:302019-05-31T21:35:36+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
ICC World Cup 2019: Team India's London Safari, see special photo | ICC World Cup 2019 : टीम इंडियाची लंडन सफारी, पाहा खास फोटो

ICC World Cup 2019 : टीम इंडियाची लंडन सफारी, पाहा खास फोटो

लंडन, आयसीसी वर्ल्ड कप 2019 : विश्वचषकाला सुरुवात झाली आहे, पण भारताच्या सामन्यांना नाही. भारताचा पहिला सामना दक्षिण आफ्रिकेबरोबर ५ जूनला होणार आहे. पण त्यापूर्वी भारतीय संघ लंडन सफारी करत असल्याचे पाहायला मिळाले.

भारतीय संघातील खेळाडू यावेळी जंगलासारख्या परिसरामध्ये दिसत आहेत. यावेळी खेळाडूंच्या मागे लाकडांनी बांधलेली घरं दिसत आहेत. त्याचबरोबर एकदम शांत वातावरण असल्याचेही पाहायला मिळत आहे. बीसीसीआयने यावेळी संघातील खेळाडूंचे तीन फोटो आपल्या ट्विटरवर पोस्ट केले आहेत. यामधील पहिल्या फोटोमध्ये माजी कर्णधार आणि यष्टीरक्षक महेंद्रसिंग धोनी, कुलदीप यादव आणि युजवेंद्र चहल दिसत आहे. दुसऱ्या फोटोमध्ये लोकेश राहुल आणि भारताचे फलंदाजी प्रशिक्षक संजय बांगर दिसत आहे. तिसऱ्या फोटोमध्ये रोहित शर्मा, रवींद्र जडेजा आणि केदार जाधव दिसत आहेत.



Web Title: ICC World Cup 2019: Team India's London Safari, see special photo