Join us

ICC World Cup 2019 : टीम इंडियाने पाहिला 'भारत'; सलमानने मानले आभार

भारतीय संघातील केदार जाधवने याबाबतचे ट्विट केले असून फोटोही शेअर केला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2019 19:16 IST

Open in App

ट्रेंट ब्रिज, आयसीसी वर्ल्ड कप 2019 : भारतीय संघाने विश्वचषकात दोन सामने जिंकले आहेत. आता न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यासाठी भारताचा संघ सराव करत आहे. पण या दरम्यानच्या काळात भारतीय संघाने भारत हा सिनेमा पाहिला. भारतीय संघातील केदार जाधवने याबाबतचे ट्विट केले असून फोटोही शेअर केला आहे.

भारतीय संघ सध्या नॉटिंगहॅममध्ये आहे. भारतीयांनी वेळात वेळ काढून भारत हा सिनेमा पाहिला. केदारबरोबर यावेळी महेद्रसिंग धोनी, लोकेश राहुल, हार्दिक पंड्या, शिखर धवन हे भारतीय खेळाडू दिसत आहेत.हा सिनेमा पाहिल्यावर बॉलीवूडमधील अभिनेता सलमान खानने भारतीय संघाचे आभार मानले आहेत.

... तर भारत-न्यूझीलंड सामना होणार नाही, दोन्ही संघांना मिळतील समान गुण

गतविजेत्या ऑस्ट्रेलियावर सफाईदार विजय मिळवल्यानंतर भारतीय संघ गुरुवारी न्यूझीलंडचासामना करण्यासाठी नॉटींगहॅम, ट्रेंट ब्रिज येथ मैदानावर उतरणार आहे. गुणतालिकेत अव्वल असलेल्या न्यूझीलंडशी दोन हात करण्यापूर्वी भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे. भारताचा सलामीवर शिखर धवनला दुखापतीमुळे तीन आठवडे विश्रांती घ्यावी लागणार आहे आणि त्यामुळे किवींविरुद्ध विराट कोहलीला वेगळी रणनीती आखावी लागणार आहे. पण, भारताच्या या डावपेचावर पाणी फिरण्याची लक्षणं आहेत. 

इंग्लंडमधील लहरी वातावरण लक्षात घेता नॉटींगहॅम येथे गुरुवारी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तसे झाल्यास भारत-न्यूझीलंड सामना होण्याची शक्यता कमीच आहे. इंग्लंडमध्ये गेले दोन दिवस पाऊस पडत आहे आणि तेथील हवामान खात्याच्या माहितीनुसार पुढील काही दिवस असेच वातावरण असण्याची शक्यता आहे. त्यामुळे बुधवारी मुसळधार पावसाची शक्यता आहे आणि गुरुवारी दुपारीही हलका पाऊस पडेल. अशा परिस्थितीत तेथील कमाल तापमान 13, तर किमान तापमान 10 ते 11 डिग्री सेल्सियस असणार आहे.

धवनच्या दुखापतीनंतर 'हा' खेळाडू इंग्लंडसाठी रवाना; पाकविरुद्ध खेळणार?भारताच्या वर्ल्ड कप मोहिमेला मंगळवारी मोठा धक्का बसला. अंगठ्याला दुखापत झाल्यामुळे भारताचा सलामीवीर शिखर धवनला तीन आठवडे क्रिकेटपासून दूर रहावे लागणार आहे. ऑसीविरुद्धच्या सामन्यात पॅट कमिन्सच्या गोलंदाजीवर धवनला ही दुखापत झाली होती. मंगळवारी त्याच्या या दुखापतीचा वैद्यकिय अहवाल आला आणि त्याच्या अंगठ्याला फॅक्चर झाल्याचे समोर आले. त्यामुळे बांगलादेश ( 2 जुलै) किंवा श्रीलंका ( 6 जुलै) यांच्याविरुद्ध सामन्यापर्यंत धवन खेळण्यासाठी तंदुरुस्त होईल, याची शक्यता कमीच आहे.

टॅग्स :भारत सिनेमाकेदार जाधववर्ल्ड कप 2019