Join us  

ICC World Cup 2019 : चर्चा तर होणारच... जसप्रीत बुमराहचं 'या' अभिनेत्रीशी अफेअर? कोण आहे ती? 

ICC World Cup 2019 : भारतीय क्रिकेटपटू आणि बॉलिवूड अभिनेत्री यांचं नातं नेहमी चर्चेत राहिलं आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2019 10:24 AM

Open in App

लंडन, आयसीसी वर्ल्ड कप 2019 : भारतीय क्रिकेटपटू आणि बॉलिवूड अभिनेत्री यांचं नातं नेहमी चर्चेत राहिलं आहे. अगदी  पतौडी यांच्यापासून ते विराट कोहलीपर्यंत क्रिकेट आणि बॉलिवूड हे एकत्र आलेले अनेकदा पाहायला मिळालं आहे. पण, अनेकदा त्या केवळ वायफळ चर्चाच राहिल्या. सध्या वर्ल्ड कप स्पर्धा सुरू आहे आणि भारतीय संघ 5 गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहे. भारताचा जलदगती गोलंदाज जसप्रीत बुमराह याचं नाव सध्या एका अभिनेत्रीशी जोडलं जात आहे. दक्षिण भारतीय अभिनेत्री अनुपमा परमेश्वरन असे या अभिनेत्रीचं नाव आहे.

सोशल मीडियावर बुमराह आणि अनुपमा एकमेकांच्या पोस्टला लाईक्स करत असतात आणि विशेष म्हणजे बुमराहच्या फ्रेंड लिस्टमध्ये अनुपमा ही एकमेव दक्षिण भारतातील अभिनेत्री आहे. त्यामुळे या दोघांच्या अफेअरची चर्चा सुरू झाली आहे. बुमराहनं या नात्याबद्दल कोणतिही प्रतिक्रीया दिली नसली तरी अनुपमानं आम्ही चांगले मित्र असल्याचे स्पष्ट केले. त्यापलिकडे आमच्यात असं काही नाही, असंही अनुपमानं सांगितलं. ओरीसा पोस्ट या वेबसाईटवर ही बातमी वाचल्यानंतर अनुपमाला हसू आवरलं नाही.

अनुपमाने नटसर्वभूवमा या कन्नड चित्रपटातून काही महिन्यापूर्वी या क्षेत्रात पदार्पण केले होते. त्या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसादही मिळाला होता. सध्या ती एका तेलुगू चित्रपटाची तयारी करत आहे. 

शिखर धवन 'या' सामन्यातून कमबॅक करणार, कॅप्टन कोहलीकडून मोठी अपडेटऑस्ट्रेलियाविरुद्धच्या लढतीत झालेल्या दुखापतीमुळे तीन आठवडे क्रिकेटपासून दूरावलेला शिखर धवन वर्ल्ड कप स्पर्धेत कमबॅक करण्यासाठी सज्ज होत आहे. पॅट कमिन्सने टाकलेल्या चेंडूवर भारताच्या सलामीवीराच्या अंगठ्याला दुखापत झाली होती. तरीही त्यानं जिद्दीनं खेळ करत 117 धावा चोपून काढल्या होत्या. मात्र, दुखापतीमुळे तो क्षेत्ररक्षणाला आला नाही. तो दुखापतीतून सावरत असून 10-12 दिवसांत तो कमबॅक करेल असा विश्वास आहे. 

ESPNcricinfoच्या हाती लागलेल्या माहितीनुसार साखळी फेरीच्या अखेरच्या टप्प्यात धवन पुनरागमन करेल. त्यामुळे तो यजमान इंग्लंडविरुद्ध 30 जूनला एडबॅस्टन येथे होणाऱ्या लढतीत खेळण्याची शक्यता आहे. त्यानंतर भारतीय संघ बांगलादेश ( 2 जुलै) आणि श्रीलंका ( 6 जुलै) या संघांचा सामना करेल. पण, धवनला पाकिस्तान ( 16 जून), अफगाणिस्तान ( 22 जून) आणि वेस्ट इंडिज ( 27 जून) या लढतींना मुकावे लागणार आहे. धवनला स्टॅण्ड बाय खेळाडू म्हणून रिषभ पंतला इंग्लंडला बोलावण्यात आले आहे.

टॅग्स :वर्ल्ड कप 2019जसप्रित बुमराहबॉलिवूडविरूष्का