लॉर्ड्स, आयसीसी वर्ल्ड कप 2019 : वर्ल्ड कप स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आलेल्या पाकिस्तान संघाने विजयी निरोप घेतला. पाकिस्तानने अखेरच्या साखळी सामन्यात बांगलादेशवर 94 धावांनी विजय मिळवला. शाहिन आफ्रिदीने 35 धावांत 6 विकेट घेतल्या. वर्ल्ड कप स्पर्धेत एकाच सामन्यात पाच विकेट घेणारा तो युवा गोलंदाज ठरला. पाकिस्तानने विजयासाठी ठेवलेल्या 316 धावांचा पाठलाग करताना बांगलादेशचा संघ 221 धावांत तंबूत परतला. या सामन्यानंतर पाकिस्तान संघाचा अनुभवी खेळाडू शोएब मलिकने आंतरराष्ट्रीय वन डे क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्याचे जाहीर केले. मलिक हा सध्याच्या वर्ल्ड कप स्पर्धेत 1990च्या दशकातील सक्रिय असलेला एकमेव आशियाई खेळाडू होता.
- Cricket Buzz»
- बातम्या»
- ICC World Cup 2019 : 90 च्या दशकापासून सक्रिय असलेला एकमेव खेळाडू निवृत्त; कोण आहे तो?
ICC World Cup 2019 : 90 च्या दशकापासून सक्रिय असलेला एकमेव खेळाडू निवृत्त; कोण आहे तो?
ICC World Cup 2019 : वर्ल्ड कप स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आलेल्या पाकिस्तान संघाने विजयी निरोप घेतला.
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2019 10:18 IST