ललित झांबरे : विश्वचषक स्पर्धेत कुणी १५ वर्षांच्या, कुणी १२ वर्षांच्या खंडानंतर खेळलेय का, असा प्रश्न विचारल्यास आश्चर्य वाटू देवू नका कारण असेही क्रिकेटपटू आहेत जे एवढ्या प्रदीर्घ खंडानंतर विश्वचषक स्पर्धेत खेळले आहेत. विशेष म्हणजे असा एकटा-दुकटा खेळाडू नाही तर तीन खेळाडू आहेत. वेस्ट इंडिज व कॅनडा अशा दोन देशांचे प्रतिनिधित्व केलेला अँडरसन कमिन्स, पाकिस्तानचा शोएब मलिक आणि इंग्लंडचा लियाम प्लंकेट हे ते तीन खेळाडू आहेत.
![]()
यापैकी अँडरसन कमिन्सची मोठी अद्भूत नोंद आहे. तो १९९२ च्या विश्वचषक स्पर्धेत खेळला वेस्ट इंडिजसाठी आणि त्यानंतर १५ वर्षानंतर थेट २००७ च्या स्पर्धेत खेळला कॅनडासाठी. मधल्या काळातील १९९६, १९९९ व २००३ चे विश्वचषक तो बाहेरच होता. अशा प्रकारे तब्बल तीन स्पर्धानंतर पुन्हा विश्वचषक स्पर्धेत खेळलेला तो एकमेव क्रिकेटपटू आहे.
![]()
लियाम प्लंकेट व शोएब मलिक हे २००७ च्या स्पर्धेनंतर आता पुन्हा एकदा विश्वचषक सामने खेळत आहेत.
या प्रदीर्घ कारकिर्द असलेल्या क्रिकेटपटूंच्या या विक्रमाचा तपशील असा..
१)अँडरसन कमिन्स - १४ वर्ष ३६२ दिवस
१८ मार्च १९९२ : वेस्ट इंडिज वि. ऑस्ट्रेलिया, मेलबोर्न
१४ मार्च २००७ : कॅनडा वि. केनिया, ग्रोस आयलेट
२) शोएब मलिक - १२ वर्ष ७४ दिवस
२१ मार्च २००७ : पाकिस्तान वि. झिम्बाब्वे, किंग्स्टन
०३ जून २०१९ : पाकिस्तान वि. इंग्लंड, ट्रेंट ब्रिज
३) लियाम प्लंकेट - १२ वर्ष ३९ दिवस
२१ एप्रिल २००७ : इंग्लंड वि. वेस्ट इंडिज, ब्रिजटाऊन
३० मे २०१९ : इंग्लंड वि. दक्षिण आफ्रिका, लंडन