Join us

ICC World Cup 2019 : शाहिन आफ्रिदीचा भेदक मारा, न्यूझीलंडच्या 237 धावा

शाहिनच्या तीन विकेट्समुळे न्यूझीलंडची ५ बाद ८३ अशी दयनीय अवस्था झाली होती.

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2019 19:50 IST

Open in App

लंडन, आयसीसी वर्ल्ड कप 2019 : शाहिन आफ्रिदीच्या भेदक माऱ्यामुळे न्यूझीलंडची भंबेरी उडाल्याचे पाहायला मिळाले होते. कारण शाहिनच्या तीन विकेट्समुळे न्यूझीलंडची ५ बाद ८३ अशी दयनीय अवस्था झाली होती. पण त्यानंतर जेम्स नीशाम आणि कॉलिन डी ग्रँडहोम यांच्या दमदार फलंदाजीमुळे न्यूझीलंडला आव्हानात्मक धावसंख्या रचता आली.

न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. पण हा निर्णय त्यांच्याच अंगलट आल्याचे पाहायला मिळाले. कारण त्यांचा अर्धा संघ ८३ धावांमध्येच तंबूत परतला होता. त्यानंतर जेम्स नीशाम आणि कॉलिन डी ग्रँडहोम यांनी सहाव्या विकेटसाठी १८३ धावांची भागीदारी रचली आणि संघाला दोनशे धावांपर्यंत मजल मारून दिली.

या सामन्यात शाहीनचा स्पेल न्यूझीलंडला चांगलाच महागात पडला. कारण शाहीनने कॉलिन मुन्रो, रॉस टेलर आणि टॉम लॅथम यांना स्वस्तात तंबूचा रस्ता दाखवला. फॉर्मात असलेल्या केन विल्यम्सनला शादाब खानने माघारी धाडले.

टॅग्स :वर्ल्ड कप 2019पाकिस्तानन्यूझीलंड