- हर्षा भोगले लिहितात...
श्रीलंकेविरुद्ध भारतीय संघ फार पुढील विचार करीत मैदानात उतरेल. टीम इंडिया या लढतीच्या वेळी बर्मिंगहॅम व उपांत्य फेरीबाबत विचार करू शकते, श्रीलंकेचे पूर्ण लक्ष या लढतीवर राहील कारण त्यांचा स्पर्धेतील प्रवास निराशाजनक ठरला आहे. दरम्यान, या संघाला उपांत्य फेरी गाठण्याची फार आशाही नव्हती, पण इंग्लंडविरुद्धच्या विजयानंतर त्यांच्या अपेक्षा उंचावल्या होत्या.
भारतीय संघ या लढतीचा उपयोग बर्मिंगहॅमच्या तयारीसाठी करण्यास प्रयत्नशील राहील. उपांत्य फेरीत सीमारेषेची लांबी समाधानकारक राहील. कारण ही लढत मधल्या खेळपट्टीवर खेळल्या जाणार आहे. श्रीलंकेविरुद्ध लीड््समध्ये खेळल्या जाणाऱ्या लढतीमध्येही सीमारेषेची लांबी अशीच राहण्याची आशा आहे. बांगलादेशविरुद्धच्या लढतीनंतर विराट कोहलीने कबुली दिली होती, त्याने मैदानाचा आकार बघून संघाची निवड केली होती.
जर अंतिम ११ खेळाडूंमध्ये केदार जाधवचे पुनरागम झाले तर मला आश्चर्य वाटणार नाही. त्याने केवळ सहा षटके गोलंदाजी केली असली तरी भारताच्या पाच गोलंदाजांच्या योजनेनुसार तो चांगला पर्याय ठरतो. तीन वेगवान गोलंदाजांसह मैदानात उतरण्याचा निर्णय नेहमी पारंपरिक असतो, पण माझ्या मते भारतीय संघ याबाबत गांभीर्याने विचार करीत असेल, असे मला वाटत नाही. विशेषत: हार्दिक पांड्याची कामगिरी बघितल्यानंतर, पण माझ्या मते श्रीलंकेविरुद्ध उपांत्य फेरीतील संघच खेळवला पाहिजे.
विराट कोहलीच्या पाच अर्धशतकांमुळे काही लोक खूश झाले असतील आणि विराटने स्वत: खूश असल्याचे म्हटले आहे. कारण या खेळी संघासाठी महत्त्वाच्या होत्या. पण, जगातील सर्वोत्तम खेळाडू असताना अर्धशतकांच्या रुपांतर शतकामध्ये करण्यात अपयश आले तर निराश होणे स्वाभाविक आहे.