Join us  

India Vs New Zealand, Semi Final: न्यूझीलंडविरुद्ध 'ही' चूक पडू शकते महागात, सांगतोय सचिन तेंडुलकर

ICC World Cup 2019 : विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ वर्ल्ड कप स्पर्धेच्या उपांत्य फेरीत आज न्यूझीलंडचा सामना करायला मैदानावर उतरणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 09, 2019 12:02 PM

Open in App

मँचेस्टर, आयसीसी वर्ल्ड कप 2019 : विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ वर्ल्ड कप स्पर्धेच्या उपांत्य फेरीत आज न्यूझीलंडचा सामना करायला मैदानावर उतरणार आहे. स्पर्धेतील दोन्ही संघांची कामगिरी पाहता, भारताचे पारडे जड मानले जात आहे. सट्टेबाजारातही टीम इंडिया आणि रोहित शर्माला पसंती आहे. पण, या सामन्यापूर्वी महान फलंदाज सचिन तेंडुलकरनं कर्णधार कोहली व संघाला एक महत्त्वाचा सल्ला दिला आहे.

सराव सामन्यात उभय संघ एकमेकांसमोर आले होते आणि त्यात केन विलियम्सच्या न्यूझीलंडने बाजी मारली होती. साखळी फेरीतील सामना पावसामुळे रद्द झाला होता. त्यामुळे या महत्त्वाच्या सामन्यात कडवी टक्कर पाहायला मिळेल. तेंडुलकर म्हणाला,''आपण ज्या प्रकारे आतापर्यंत खेळत आलो आहोत, तसाच खेळ आजही करायला हवा. इतरांशी तुलना करण्याची गरज नाही. मी टीम इंडियाला सांगू इच्छितो की आपला नैसर्गिक खेळ करा, उगाच प्रयोग करायला जाऊ नका. न्यूझीलंड हा चांगला संघ आहे. त्यांनी सातत्यपूर्ण कामगिरी केलेली आहे.''

सट्टाबाजारात विराट कोहलीपेक्षा हिटमॅन रोहित शर्माला सर्वाधिक भावलैडब्रोक्स और बेटवे या दोन्ही ऑनलाइन सट्टेबाजी करणाऱ्या वेबसाइट्स आहेत. या सामन्यात भारत न्यूझीलंडवर मात करेल, असे या सट्टेबाजी कंपन्यांना वाटत आहे. लैडब्रोक्सने भारताच्या विजयावर 13/8 असा भाव दिला आहे. त्याचबरोबर इंग्लंड (15/8), ऑस्ट्रेलिया (11/4) आणि न्यूझीलंडला (8/1) असे भाव दिले आहेत. या सट्टेबाजींने दिलेल्या भावानुसार भारतीय संघ हा वर्ल्ड कप स्पर्धेचा संभाव्य विजेता समजला जात आहे. बेटवे या सट्टेबाजी कंपनीने भारताला 2.8 असा भाव दिला आहे. त्याचबरोबर इंग्लंड (3), ऑस्ट्रेलिया (3.8) आणि न्यूझीलंडला (9.5) असे भाव दिले आहेत. बेटवे या कंपनीनुसारही भारतीय संघ वर्ल्ड कप  जिंकेल, असे म्हटले जात आहे. 

रोहितसाठी 8/13 असा भाव लावला गेला आहे, त्यापाठोपाठ ऑस्ट्रेलियाच्या डेव्हिड वॉर्नरला ( 11/8) आणि इंग्लंडच्या जो रूटला ( 20/1) असा भाव लागला आहे. भारताचा कर्णधार विराट कोहलीसाठी ( 33/1) असा भाव आहे. जर एखाद्यावर 13/8 असा भाव लागला असेल, तर त्या खेळाडूवर जेवढे पैसे लागले असतील आणि विजयी रकमेला 13ने गुणून आणि नंतर 8ने भागून विजेत्याला रक्कम दिली जाईल.  

टॅग्स :वर्ल्ड कप 2019सचिन तेंडुलकरभारतन्यूझीलंड