- ग्रॅमी स्मिथ
बांगलादेशविरुद्ध खेळण्यासाठी टाँटन हे वेस्ट इंडिजसाठी आवडते स्थळ आहे. येथे चेंडू अलगद बॅटवर येतो. हीच गोष्ट विंडीजच्या फलंदजांना पसंत आहे. माझ्यामते विंडीजने हा सामना मोठ्या फरकाने जिंकायला हवा. बांगलादेशने काही संघांना धक्का देण्याची तयारी केली होती आणि यामध्ये हा संघ जवळपास पोहोचला देखील. यादरम्यान शाकिब अल हसन या एकमेव खेळाडूंवर गरजेपेक्षा अधिक विसंबून असलेला जाणवला. विश्व क्रिकेटमध्ये माझा सन्मान का केला जातो, हे शाकिबने दाखवून दिले. तो फलंदाजीच नव्हे तर गोलंदाजीतही योगदान देत आहे.
टाँटनमध्ये बांगलादेशला तमीम इक्बालकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा असेल. शाकिब संपूर्ण स्पर्धेत अपेक्षांचे ओझे पेलू शकला नाही. विंडीजला भीती वाटावी असा प्रतिस्पर्धी संघ त्यांच्यापुढे आज असणार नाही. तथापि विंडीजला आपल्या आघाडीच्या फळीकडून जबाबदार खेळीची अपेक्षा असेल. संघातील फलंदाजांनी आपल्या बळावर अद्याप कुठला सामना जिंकून दिलेला नाही. या संघातील फलंदाजांमध्ये मात्र मॅचविनर होण्याची क्षमता नक्की आहे. ख्रिस गेलने धावांचा पाऊस पाडल्यास बांगला देशच्या गोलंदाजांसाठी त्याला थोपविणे कठीण जाईल.
शाकिबशिवाय बांगलादेशकडे गोलंदाजीत अधिक भरवशाचे पर्याय उपलब्ध नाहीत. द. आफ्रिकेविरुद्ध साजरा केलेल्या विजयाचा अपवाद वगळता संघाची कामगिरी तितकीशी समाधानकारक वाटत नाही. बोचरी थंडी, हवामानातील आर्द्रता, ताजीतवानी खेळपट्टी, या सर्व बाबी बांगलादेश संघाच्या पचनी पडताना दिसत नाहीत. या वातावरणात प्रभावी ठरू शकतील असे वेगवान गोलंदाज बांगला देशकडे नाहीत.
विंडीजकडे भेदक वेगवान गोलंदाजांची चांगली फळी आहे. बांगला देश संघ हे आव्हान कसे परतवेल, हे पाहणे रंजक ठरणार आहे. वेस्ट इंडिजचे गोलंदाज इंग्लंडविरुद्धच्या कामगिरीवर निश्चितपणे निराश असतील. ओशाने थामसच्या चेंडूत वेग कमी होता. आंद्रे रसेल हाही पूर्ण तंदुरुस्त नव्हता. शेल्डन कॉटरेल हा मात्र मला प्रभावी वाटला. स्वत:ची भूमिका समजू शकेल असा तो गोलंदाज आहे.त्याच्याकडे थॉमस आणि रसेल यांचासारखा वेग नसेलही पण बळी घेण्यात तो नेहमी यशस्वी ठरतो. वेस्ट इंडिज बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात विजयाचा दावेदार वाटतो यात शंका नाही, पण त्यांच्या खेळाडूंनी केवळ प्रेक्षकांचे मनोरंजन करणे टाळायला हवे. या संघाला कामगिरीत सातत्य दाखवावेच लागेल.