लॉर्ड्स, आयसीसी वर्ल्ड कप 2019 : रोमहर्षक ठरलेल्या लढतीत यजमान इंग्लंडने सर्वाधिक चौकाराच्या मदतीनं न्यूझीलंडवर विजय मिळवून वर्ल्ड कप विजयाचा दुष्काळ संपवला. इंग्लंडने प्रथमच वर्ल्ड कप जिंकण्याचा मान पटकावला. यापूर्वी तीन वेळा अंतिम फेरीत पोहोचूनही इंग्लंडला जेतेपदाचा चषक उंचावता आला नव्हता. इयॉन मॉर्गनच्या नेतृत्वाखाली इंग्लंडने ही ऐतिहासिक कामगिरी करून दाखवली. 44 वर्षांत इंग्लंडने प्रथमच वर्ल्ड कप जिंकला त्यामुळे त्यांच्या आनंदासमोर गगनही ठेंगणे वाटत होते. पण, वर्ल्ड कप हातात घेतल्यानंतर संघासोबत जल्लोष करण्याचे सोडून मोईन अली आणि आदिल रशीद यांनी सेलिब्रेशनपासून लांब राहणे पसंत केले. त्यांनी असे का केले?
न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून 8 बाद 241 धावा केल्या. प्रत्युत्तरात इंग्लंडचा संपूर्ण संघ 241 धावांवरच तंबूत परतला. त्यामुळे सामना सुपर ओव्हरमध्ये गेला. यातही इंग्लंडने प्रथम फलंदाजी करताना 15 धावा केल्या आणि प्रत्युत्तरात न्यूझीलंडला 15 धावा करता आल्या. सर्वाधिक चौकार मारल्यामुळे इंग्लंडला विजयी घोषित करण्यात आले. या सामन्यात बेन स्टोक्सने जीगरबाज खेळी केली. त्यानं 98 चेंडूंत 5 चौकार व 2 षटकार लगावून 84 धावांची खेळी केली. त्यामुळे त्याला सामनावीर म्हणून घोषित करण्यात आले.
पाहा व्हिडीओ
जगज्जेत्या इंग्लंडचे खेळाडू विक्रमांचे धनीविश्वचषकातील पहिल्यांदाच सुपर ओव्हरमधील अंतिम सामना. अशा काही लक्षवेधी गोष्टींसह विश्वचषकाचा इतिहास. पण, या वेळी या चषकावर नवे नाव कोरले गेले ते इंग्लंडचे. यजमान जगज्जेते झाले आणि या जगज्जेत्या काही खेळाडूंनी यंदा विक्रमांचे इमले रचले. इंग्लंडच्या माजी दिग्गज खेळाडूंचे विक्रम मोडीत काढण्यात आले. त्यावर एक नजर...