Join us

ICC World Cup 2019 : आफ्रिकेला धक्का; हो-नाय करता करता 5 सेकंदात गमावली विकेट, पाहा व्हिडीओ

ICC World Cup 2019:बांगलादेशने विजयासाठी ठेवलेल्या 331 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेने सावध सुरुवात केली.

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2019 20:39 IST

Open in App

लंडन, आयसीसी वर्ल्ड कप 2019 : बांगलादेशने विजयासाठी ठेवलेल्या 331 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेने सावध सुरुवात केली. हाशिम अमलाच्या अनुपस्थितीत सलामीला आलेल्या एडन मार्कराम आणि क्विंटन डी'कॉक यांनी चांगला खेळ केला. पण, दहाव्या षटकात ताळमेळ जमलेल्या जोडीचं फिसकटलं आणि हो-नाय च्या चक्करमध्ये पाच सेकंदात डी'कॉकला माघारी परतावे लागले. मुशफिकर रहिमने त्याला धावबाद केले.

दक्षिण आफ्रिकेने दिलेले फलंदाजीचे आव्हान स्वीकारत बांगलादेशच्या आघाडीच्या फलंदाजांनी दमदार कामगिरी केली. तमिम इक्बाल आणि सौम्या सरकार यांच्या दमदार सलामीनंतर अनुभवी शकिब अल हसन आणि मुशफीकर रहमान यांनी तिसऱ्या विकेटसाठी 142 धावांची विक्रमी भागीदारी केली. त्यानंतर अन्य फलंदाजांनी हातभार लावत बांगलादेशला 6 बाद 330 धावांचा पल्ला गाठून दिला. वन डे क्रिकेटमधील बांगलादेशची ही सर्वोत्तम धावसंख्या ठरली आहे.

पाहा व्हिडीओ... 

टॅग्स :वर्ल्ड कप 2019द. आफ्रिकाबांगलादेश