Join us  

ICC World Cup 2019 : भारत-पाकिस्तान सामन्यावर 'देवा'ची भविष्यवाणी

चक्क 'देवा'नेच या सामन्याबाबत भविष्यवाणी केल्याचे पाहायला मिळाले आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 12, 2019 7:45 PM

Open in App

ट्रेंट ब्रिज, आयसीसी वर्ल्ड कप 2019 :  भारत आणि पाकिस्तान यांच्यात वर्ल्ड कप स्पर्धेत होणारा सामना हा युद्धापेक्षा कमी नसतो, असे बऱ्याच जणांचे म्हणणे असते. यंदाच्या विश्वचषकात भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना 16 जूनला येत्या रविवारी होणार आहे. हा सामना कोण जिंकेल, याबाबत तर्कवितर्क लढवले जात आहे. पण चक्क 'देवा'नेच या सामन्याबाबत भविष्यवाणी केल्याचे पाहायला मिळाले आहे.

इंग्लंड आणि वेल्स येथे होणाऱ्या वर्ल्ड कप स्पर्धेत भारत-पाक सामना 16 जूनला मँचेस्टर येथे खेळवण्यात येणार आहे. पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने वर्ल्ड कप स्पर्धेतील पाकविरुद्धच्या सामन्यावर बहिष्कार घालावा अशी मागणी होत आहे. सौरव गांगुली आणि गौतम गंभीर यांच्यासह अनेक माजी खेळाडूंनी बहिष्कार टाकण्याची भूमिका मांडली. 

वर्ल्ड कप स्पर्धेत येत्या रविवारी भारत-पाकिस्तान हा महामुकाबला रंगणार आहे. वर्ल्ड कप जिंकला नाही तरी चालेल, पण एकमेकांना हरवा; अशीच भावना या सामन्यादरम्यान दोन्ही देशांच्या चाहत्यांमध्ये असते. त्याचाच उत्पादक कंपन्या फायदा उचलून वेगवेगळ्या जाहिराती तयार करत आहेत. पण, त्या जाहिराती करताना अनेकदा पातळी घसरलेली पाहायला मिळाली आहे. ताजं उदाहरण द्यायचं झाल्यास स्टार स्पोर्ट्स वाहीनीनं केलेली 'अब्बू' हा जाहिरात आणि त्याला पाकिस्तानकडून मिळालेल प्रत्युत्तर. त्यामुळे सोशल साईटवर वॉर सुरू झाला आहे. भारताची आघाडीची टेनिसपटू आणि पाकिस्तानचा क्रिकेटपटू शोएब मलिकची पत्नी सानिया मिर्झानं या जाहिरातींवरून घरचा अहेर दिला आहे.येत्या रविवारी (16 जून) भारत आणि पाकिस्तानचे संघ भिडणार आहेत. आतापर्यंत वर्ल्ड कप स्पर्धेत सहावेळा दोन्ही संघ आमनेसामने आले आहेत. मात्र सर्वच्या सर्व सामन्यांमध्ये पाकिस्तानला पराभव पत्करावा लागला. यानंतर आता 16 जूनच्या सामन्याआधी पाकिस्तानच्या एका वाहिनीनं एक आक्षेपार्ह जाहिरात तयार केली. यामध्ये विंग कमांडर अभिनंदन यांच्यासारखी दिसणारी एक व्यक्ती चहा पिताना दाखवण्यात आली आहे. पाकिस्ताननं पातळी सोडणारी जाहिरात तयार केली आहे. बालाकोट एअर स्ट्राइकनंतर पाकिस्तानी हवाई दलासोबत झालेल्या चकमकीदरम्यान पाकिस्तानच्या ताब्यात सापडलेल्या विंग कमांडर अभिनंदन यांचा वापर जाहिरातीत करण्यात आला आहे. यंदाचा वर्ल्ड कप आमचाच असेल, असा संदेश देणारी आक्षेपार्ह जाहिरात पाकिस्तानमधील वाहिनीनं तयार केली आहे.  दोन्ही देशांमध्ये सुरू असलेल्या या जाहिरातींवर सानिया मिर्झा चांगलीच भडकली आहे. ती म्हणाली,''दोन्ही देशांमध्ये अशा द्वेश निर्माण करणाऱ्या जाहिराती तयार करण्यात आल्या आहेत. अशा प्रकारच्या जाहिरातींची खरचं आवश्यकता नाही. मुर्खपणाचा बाजार मांडला आहे. हा केवळ क्रिकेट सामना आहे आणि त्याची दोन्ही देशांतील चाहत्यांमध्ये चांगली उत्सुकता आहे." भारताचे माजी विश्वविजेते कर्णधार कपिल देव यांनी भारत-पाकिस्तान सामन्यावर आपले मत व्यक्त केले आहे. कपिल म्हणाले की, " भारतीय संघ समतोल आहे. त्याबरोबर भारतापुढे बरेच पर्याय उपलब्ध आहेत. आम्ही जेव्हा खेळत होतो, तेव्हा पाकिस्तानचा संघ तगडा होता. पण सध्याच्या घडीला पाकिस्तानचा संघ तेवढा बलाढ्य वाटत नाही. त्यामुळे हा सामना भारतच जिंकेल, असे मला वाटते."16 जूनला मँचेस्टर येथील ओल्ड ट्रॅफर्ड स्टेडियमवर ही लढत होणार आहे. पण, याही लढतीवर पावसाचं सावट असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. 

टॅग्स :कपिल देवभारत विरुद्ध पाकिस्तानवर्ल्ड कप 2019