Join us

ICC World Cup 2019 : पाकिस्तान थेट पोहोचला चौथ्या स्थानी, श्रीलंकेचीही गरुड भरारी, अशी आहे गुणतालिका

ICC World Cup 2019 : पाकिस्तान आणि श्रीलंका यांच्यातील वर्ल्ड कप स्पर्धेतील शुक्रवारचा सामना पावसामुळे रद्द झाला.

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2019 21:43 IST

Open in App

लंडन, आयसीसी वर्ल्ड कप 2019 : पाकिस्तान आणि श्रीलंका यांच्यातील वर्ल्ड कप स्पर्धेतील शुक्रवारचा सामना पावसामुळे रद्द झाला. त्यामुळे दोन्ही संघांना प्रत्येकी 1-1 गुणावर समाधान मानावे लागले. या सामन्यानंतर श्रीलंका आणि पाकिस्तान संघाने गुणतालिकेत मोठी भरारी घेतली आहे. पाकिस्तान आणि श्रीलंका या दोन्ही संघांच्या खात्यात प्रत्येकी 3 गुण झाले आहेत. पण, नेट रनरेटच्या जोरावर श्रीलंकेने गरुड भरारी घेतली आहे. या लढतीपूर्वी श्रीलंका सातव्या, तर पाकिस्तान आठव्या स्थानावर होता.

श्रीलंकेला पहिल्या सामन्यात न्यूझीलंडकडून हार मानावी लागली होती, तर त्यांनी अफगाणिस्तानला नमवून स्पर्धेत कमबॅक केले. पाकिस्तानला सलामीला वेस्ट इंडिजकडून पराभव पत्करावा लागला होता, पण त्यांनी यजमान इंग्लंडला नमवण्याचा पराक्रम केला. श्रीलंका आता गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर, तर पाकिस्तानने चौथ्या स्थानावर झेप घेतली आहे. श्रीलंकेचा नेट रनरेट -1.517 असा आहे, तर पाकिस्तानचा -2.412 असा आहे. त्यामुळे श्रीलंकेने आघाडी घेतली आहे. 

टॅग्स :वर्ल्ड कप 2019पाकिस्तानश्रीलंका