लंडन, आयसीसी वर्ल्ड कप 2019 : ऑस्ट्रेलियापाठोपाठ भारतीय संघानेही वर्ल्ड कप स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश मिळवला आहे. उर्वरित दोन स्थानांसाठी इंग्लंड, न्यूझीलंड आणि पाकिस्तान यांच्यात शर्यत आहे. भारतीय संघाने रविवारच्या सामन्यात इंग्लंडवर विजय मिळवला असता तर पाकिस्तानचा मार्ग मोकळा झाला असता, परंतु टीम इंडियाला विजयी मालिका कायम राखता आली नाही. तरीही पाकिस्तान संघाने उपांत्य फेरीच्या अपेक्षा सोडलेल्या नाही. भारताकडून इच्छापूर्ती न झालेल्या पाकिस्ताननं आता न्यूझीलंडच्या गाऱ्हाणं गायला सुरुवात केले आहे. इंग्लंडला त्यांनी पराभूत केल्यास पाकिस्तानचा उपांत्य फेरीचा मार्ग मोकळा होणार आहे. त्यामुळे पाकिस्तानचे उपांत्य फेरीचे तिकीट न्यूझीलंडच्या हातात आहे आणि सोशल मीडियावर आजच्या सामन्यावर मीम्सचा पाऊस पडत आहे.
- Cricket Buzz»
- बातम्या»
- ICC World Cup 2019 : पाकिस्तानचे आता न्यूझीलंडकडे साकडे; सोशल मीडियावर मीम्सचा धुमाकूळ
ICC World Cup 2019 : पाकिस्तानचे आता न्यूझीलंडकडे साकडे; सोशल मीडियावर मीम्सचा धुमाकूळ
ICC World Cup 2019 : ऑस्ट्रेलियापाठोपाठ भारतीय संघानेही वर्ल्ड कप स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश मिळवला आहे.
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2019 12:04 IST