Join us  

ICC World Cup 2019 : असा एक 'पराक्रम' ज्यात पाकिस्तानी अव्वल, भारतीय संघ तळाला! 

ICC World Cup 2019 : पाकिस्तान संघाने वर्ल्ड कप स्पर्धेत रविवारी दक्षिण आफ्रिकेवर दणदणीत विजय मिळवून उपांत्य फेरीच्या आशा कायम राखल्या आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2019 10:22 AM

Open in App

लंडन, आयसीसी वर्ल्ड कप 2019 : पाकिस्तान संघाने वर्ल्ड कप स्पर्धेत रविवारी दक्षिण आफ्रिकेवर दणदणीत विजय मिळवून उपांत्य फेरीच्या आशा कायम राखल्या आहेत. फलंदाजी व गोलंदाजी या दोन्ही विभागात सुधारणा करताना पाकिस्ताननं विजय मिळवला. त्यांनी उभ्या केलेल्या 7 बाद 308 धावांचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेला 9 बाद 259 धावांपर्यंतच मजल मारता आली. या विजयानंतर सोशल मीडियावर पाक संघाचे कौतुक होत आहे. पण, पाकिस्तान संघाच्या क्षेत्ररक्षणात अजूनही हवी तशी सुधारणा पाहायला मिळालेली नाही. या सामन्यात पाकिस्तानच्या खेळाडूंनी सलग दोन चेंडूंवर दोन झेल सोडले. त्यामुळे सोशल मीडियावर त्यांच्यावर जोक्स फिरत आहेत. या सामन्यात पाकिस्तान संघाने असा एक 'पराक्रम' केला की, ज्यात भारतीय संघ तळाला आहे.

आफ्रिकेच्या डावाच्या 37व्या षटकात पाकिस्तानच्या खेळाडूंनी वाहब रियाजने टाकलेल्या सलग दोन चेंडूंवर व्हॅन डेर ड्युसेन व डेव्हीड वॉर्नर यांचे झेल सोडले. ड्युसेनच्या बॅटीला कट लागून चेंडू यष्टिरक्षक सर्फराज अहमदच्या दिशेने झेपावला, परंतु सर्फराजला अपयश आले आणि ड्युसेनने एक धाव काढली. पुढच्याच चेंडूवर मिलरने टोलावलेला चेंडू समीरेषेनजीक असलेल्या मोहम्मद आमीरला टीपण्यात अपयश आले. सलग दोन झेल सुटल्याने रियाज खूपच निराश झाला. पाकिस्तानी खेळाडूंनी यंदाच्या वर्ल्ड कप स्पर्धेत सर्वाधिक झेल सोडण्याचा पराक्रम केला आहे. त्यांनी 26 पैकी 14 झेल सोडले आहेत. सर्वाधिक झेल सोडणाऱ्या संघांमध्ये पाकिस्तानने अव्वल स्थान पटकावले आहे. याच विक्रमात भारतीय संघ तळाला आहे. भारतीय खेळाडूंनी 15 पैकी एकच झेल सोडला आहे. 

दरम्यान, आफ्रिकेवरील विजयानं आत्मविश्वास उंचावलेल्या कर्णधार सर्फराज अहमदनं माजी खेळाडू शोएब अख्तरला सडेतोड उत्तर दिले.  अख्तरच्या या टीकेवर सर्फराज म्हणाला,''खरं सांगायचं तर अख्तरच्या कोणत्याही वक्तव्यावर मला प्रतिक्रिया द्यायची नाही. त्याला प्रत्युत्तर देणे म्हणजे त्याच्याकडून टीकेला निमंत्रण देण्यासारखं आहे. त्याच्या म्हणण्यानुसार आम्ही खेळाडू नाहीत. आम्ही कोण आहोत, हे त्याला सांगण्याची मला गरज वाटत नाही. काही लोकं टीव्हीवर मुलाखती दिल्यानंतर स्वतःला देवच समजायला लागतात.'' 

टॅग्स :वर्ल्ड कप 2019भारतपाकिस्तान