Join us  

ICC World Cup 2019 : पाकिस्तान अजूनही उपांत्य फेरीच्या शर्यतीत, 'या' संघावर संकट; वाचा कसे

ICC World Cup 2019: पाकिस्तान अजूनही शर्यतीत आहे... कसे? चला जाणून घेऊया...

By स्वदेश घाणेकर | Published: July 01, 2019 11:35 AM

Open in App

लंडन, आयसीसी वर्ल्ड कप 2019 : भारत आणि इंग्लंड या लढतीनं भारत-पाकिस्तान या शेजाऱ्यांना एकत्र आणले. एरवी मानगुटी पकडण्यासाठी प्रयत्नशील असलेले हात एकमेकांच्या खांद्यावर दिसले. त्याला कारणही तसेच होते. भारत आणि इंग्लंड यांच्यातील सामना हा टीम इंडियासाठी नव्हे, तर पाकिस्तानसाठी महत्त्वाचा होता. म्हणूनच पाकिस्तानचे चाहते भारताच्या विजयासाठी जल्लोष करताना पाहायला मिळाले. इंग्लंडचा पराभव हा पाकिस्तानचा उपांत्य फेरीचा मार्ग मोकळा करणारा ठरला असता, परंतु तसे झाले नाही आणि पाकिस्तान उपांत्य फेरीच्या शर्यतीतून बाद झाला अशा चर्चा सुरू झाल्या. पण, पाकिस्तान अजूनही शर्यतीत आहे... कसे? चला जाणून घेऊया...

भारत-इंग्लंड यांच्या लढतीपूर्वी गुणतालिकेत पाकिस्तान 9 गुणांसह चौथ्या आणि इंग्लंड 8 गुणांसह पाचव्या स्थानावर होते. ऑस्ट्रेलिया ( 12), भारत ( 11) आणि न्यूझीलंड (11) हे अव्वल तिघांत होते. त्यामुळे चौथ्या स्थान कोणाचे यासाठी ही शर्यत सुरू आहे. काल यजमान पराभूत झाले असते, तर पाकिस्तानचा मार्ग सोपा होणार होता. कारण, पाकला अखेरच्या साखळी सामन्यात बांगलादेशचा सामना करायचा आहे आणि हा सामना जिंकून 11 गुणांसह ते थेट उपांत्य फेरीत पोहोचले असते. पण, तसे झाले नाही आणि आता खरी चुरस पाहायला मिळणार आहे.

पाकिस्तान आणि इंग्लंड यांचा प्रत्येकी एक सामना शिल्लक आहे. पाक आणि इंग्लंड यांना अनुक्रमे बांगलादेश आणि न्यूझीलंड यांचा सामना करायचा आहे. त्यामुळे दोन्ही संघांना हे सामने जिंकावेच लागणार आहेत. पाकिस्तानने विजय मिळवल्यास त्यांच्या खात्यात 11 गुण होतील, तर इंग्लंडने न्यूझीलंडला पराभूत केल्यास ते 12 गुणांसह उपांत्य फेरीत प्रवेश करतील. पण, चौथ्या स्थानासाठी मग पाकिस्तान व न्यूझीलंड यांच्यात चुरस पाहायला मिळेल. कारण दोन्ही संघांच्या खात्यात प्रत्येकी 11 गुण होतील. अशा परिस्थितीत नेट रनरेट चांगला असलेला संघ उपांत्य फेरीत प्रवेश करेल.

पाकला काय करावे लागेल?नेट रन रेटचा विचार करता न्यूझीलंड ( 0.572) आघाडीवर आहे. पाकिस्तानचा नेट रनरेट - 0.792 असा आहे. त्यामुळे किवींच्या पराभवासह त्यांना बांगलादेशवर मोठ्या फरकाने विजय मिळवावा लागणार आहे. किवींना मागील सामन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध लाजीरवाणा पराभव पत्करावा लागला आहे. कागारूंचे 243 धावांचे लक्ष पार करताना किवींचा संपूर्ण संघ 157 धावांत तंबूत परतला. त्यामुळे त्यांना उपांत्य फेरीत प्रवेश करण्यासाठी इंग्लंडविरुद्ध विजय मिळवणे हा पर्याय आहे, पण जर पराभव झाल्यास तो मोठ्या फरकाने नसावा, याची काळजी मात्र ते घेऊ शकतात. दुसरीकडे पाकिस्तानला बांगलादेशवर मोठा विजय मिळवावा लागेल. 

टॅग्स :वर्ल्ड कप 2019भारतपाकिस्तानइंग्लंडन्यूझीलंड