लंडन, आयसीसी वर्ल्ड कप 2019 : पाकिस्तान संघाने वर्ल्ड कप स्पर्धेत रविवारी दक्षिण आफ्रिकेवर दणदणीत विजय मिळवून उपांत्य फेरीच्या आशा कायम राखल्या आहेत. फलंदाजी व गोलंदाजी या दोन्ही विभागात सुधारणा करताना पाकिस्ताननं विजय मिळवला. त्यांनी उभ्या केलेल्या 7 बाद 308 धावांचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेला 9 बाद 259 धावांपर्यंतच मजल मारता आली. या विजयानंतर सोशल मीडियावर पाक संघाचे कौतुक होत आहे, परंतु या सामन्यापूर्वी याच संघावर बोचऱ्या शब्दात टीका करण्यात येत होती. त्यात माजी खेळाडूंचाही समावेश होता. पण, आफ्रिकेवरील विजयानं आत्मविश्वास उंचावलेल्या कर्णधार सर्फराज अहमदनं माजी खेळाडू शोएब अख्तरला सडेतोड उत्तर दिले.
ICC World Cup 2019 : दोन गेले, सहा राहिले; उपांत्य फेरीची चुरस आणखी वाढली!भारताकडून झालेल्या मानहानिकारक पराभवानंतर रावळपिंडी एक्स्प्रेस अख्तरनं टीका करताना सर्फराजला बिनडोक कर्णधार म्हटले होते. त्याच्या या टीकेला सर्फराजनं रविवारी उत्तर दिले. मँचेस्टर येथील ओल्ड ट्रॅफर्ड येथे झालेल्या सामन्यात भारताने 89 धावांनी मिळवलेला हा विजय आतापर्यंतचा सर्वात मोठा विजय ठरला. या सामन्यात भारतानं 50 षटकांत 5 बाद 336 धावा केल्या, पाकिस्तानला डकवर्थ लुईस नियमानुसार 40 षटकांत 302 धावांचे लक्ष्य मिळाले होते. मात्र पाकिस्तानला 40 षटकांत 212 धावाच करता आल्या. या पराभवानंतर अख्तरनं सर्फराजला चक्क बिनडोक म्हटलं होतं.