Join us  

ICC World Cup 2019 : उपांत्य फेरीतील प्रवेश अनिश्चित तरीही इंग्लंडचा खेळाडू म्हणतो वर्ल्ड कप आमचाच!

ICC World Cup 2019 : यजमान इंग्लंड संघाला वर्ल्ड कप स्पर्धेत तिसऱ्या पराभवाचा सामना करावा लागला. पाकिस्तान, श्रीलंका व ऑस्ट्रेलिया यांच्याकडून पराभव पत्करावा लागल्याने उपांत्य फेरीतील त्यांचे स्थान डळमळीत झाले आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2019 2:47 PM

Open in App

लॉर्ड्स, आयसीसी वर्ल्ड कप 2019 : यजमान इंग्लंड संघाला वर्ल्ड कप स्पर्धेत तिसऱ्या पराभवाचा सामना करावा लागला. पाकिस्तान, श्रीलंका व ऑस्ट्रेलिया यांच्याकडून पराभव पत्करावा लागल्याने उपांत्य फेरीतील त्यांचे स्थान डळमळीत झाले आहे. सात सामन्यानंतर त्यांच्या खात्यात 8 गुण जमा आहेत आणि उर्वरित दोन सामन्यात त्यांना भारत व न्यूझीलंड या तगड्या प्रतिस्पर्धींचा सामना करावा लागणार आहे. त्यामुळे त्यांचा उपांत्य फेरीतील प्रवेश हा अनिश्चित मानला जात आहे.  

पण, तरीही इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्सला वर्ल्ड कप जिंकण्याचे स्वप्न पडत आहेत. तो म्हणाला,'' हा वर्ल्ड कप आमचाच आहे. गेल्या चार वर्षांत आम्ही त्यासाठी दमदार तयारी केली आहे आणि वर्ल्ड कपचे महत्त्व आम्ही जाणून आहोत. वर्ल्ड कप स्पर्धेत देशाचे प्रतिनिधित्व करणे ही अभिमानाची गोष्ट आहे. पराभूत झालो असलो तरी आम्ही मागे हटणार नाही. हा वर्ल्ड कप आमचाच आहे.''

श्रीलंका आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही सामन्यांत स्टोक्सने विजयासाठी शर्थीचे प्रयत्न केले. श्रीलंकेविरुद्ध त्याने नाबाद 82,तर ऑस्ट्रेलियाविरुद्घ 89 धावा केल्या. तो म्हणाला,''हा पराभव निराशाजनक आहे. संघाला विजय मिळवून देण्यासाठी प्रत्येक खेळाडू योगदान देऊ इच्छित होता. धावा कुटणे आणि विकेट घेणे नेहमी चांगले वाटते, परंतु त्यानंतरही संघाला विजय मिळवून देता आला नाही, तर त्याला काहीच अर्थ राहत नाही.'' 

इंग्लंडचा पराभव ही तर बांगलादेश, श्रीलंका, पाकिस्तानसाठी गुड न्यूजश्रीलंकेपाठोपाठ यजमान इंग्लंड संघाला मंगळवारी पारंपरिक प्रतिस्पर्धी ऑस्ट्रेलियाकडूनही हार पत्करावी लागली. या पराभवामुळे इंग्लंडच्या वर्ल्ड कप स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश करण्याचा मार्ग अधिक खडतर बनला आहे. इंग्लंडला आता उर्वरित दोन्ही सामन्यांत भारत आणि न्यूझीलंड यांना पराभूत करावेच लागणार आहे.  यंदाच्या वर्ल्ड कप स्पर्धेत उपांत्य फेरीत प्रथम प्रवेश करण्याचा मान गतविजेत्या ऑस्ट्रेलियाने पटकावला. न्यूझीलंड आणि भारत उंबरठ्यावरच आहेत, परंतु चौथ्या स्थानासाठी आता इंग्लंडसह आणखी तीन संघ आहेत. इंग्लंडचा हा पराभव बांगलादेश, पाकिस्तान आणि श्रीलंका या संघांना आशेचा किरण दाखवणारा ठरला आहे.

टॅग्स :वर्ल्ड कप 2019बेन स्टोक्सइंग्लंडआॅस्ट्रेलिया