लंडन, आयसीसी वर्ल्ड कप 2019 : यंदाच्या क्रिकेट विश्वचषक स्पर्धेची अंतिम लढत खास ठरणार आहे. बऱ्याच वर्षांनंतर क्रिकेट विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम लढतीमध्ये एकदाही विश्वचषक न जिंकलेले संघ खेळणार आहेत. त्यामुळे यंदा क्रिकेटला नवा विश्वविजेता मिळणार आहे. विशेष बाब म्हणजे 1996 नंतर प्रथमच एखादा नवा संघ विश्वचषक उंचावताना दिसणार आहे. आतापर्यंत केवळ वेस्ट इंडिज, भारत, ऑस्ट्रेलिया, पाकिस्तान आणि श्रीलंका या पाचच संघांना विश्वचषक जिंकता आलेला आहे. त्यापैकी ऑस्ट्रेलियाने तब्बल पाचवेळा तर वेस्ट इंडिज आणि भारताने प्रत्येकी दोन वेळा विश्वविजेतेपद पटकावले आहे. तर पाकिस्तान आणि श्रीलंकेने प्रत्येकी एक वेळा एकदा विश्वचषक जिंकला आहे. मात्र या विश्वचषक स्पर्धेत माजी विश्वविजेत्यांपैकी कुठलाही संघ अंतिम फेरीत पोहोचला नसल्याने क्रिकेटला इंग्लंड किंवा न्यूझीलंडच्या रूपात सहावा विश्वविजेता मिळणार आहे. आज झालेल्या दुसऱ्या उपंत्य लढतीत इंग्लंडने ऑस्ट्रेलियावर मात करत अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. क्रिकेट विश्वचषकाची अंतिम फेरी गाठण्याची इंग्लंडची ही चौथी वेळ आहे. याआधी 1979, 1987 आणि 1992 मध्ये त्यांनी अंतिम फेरी गाठली होती. मात्र तिन्ही वेळा त्यांना विश्वविजेतेपद मिळवण्यात अपयश आले होते.
- Cricket Buzz»
- बातम्या»
- ICC World Cup 2019 : 1996 नंतर प्रथमच क्रिकेटला लाभणार नवा जगज्जेता
ICC World Cup 2019 : 1996 नंतर प्रथमच क्रिकेटला लाभणार नवा जगज्जेता
यंदाच्या क्रिकेट विश्वचषक स्पर्धेची अंतिम लढत खास ठरणार आहे.
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2019 21:53 IST