Join us  

ICC World Cup 2019 : इंग्लंडच्या खेळाडूने पाकला टाकले धर्मसंकटात, टीम इंडियावरून विचारला प्रश्न!

ICC World Cup 2019 : पाकिस्तानचा वर्ल्ड कप स्पर्धेतील प्रवास 1992च्या स्पर्धेप्रमाणे सुरू आहे. बुधवारी त्यांनी न्यूझीलंडला नमवून उपांत्य फेरीच्या आशा जीवंत ठेवल्या आहेत

By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2019 10:26 AM

Open in App

लंडन, आयसीसी वर्ल्ड कप 2019 : पाकिस्तानचा वर्ल्ड कप स्पर्धेतील प्रवास 1992च्या स्पर्धेप्रमाणे सुरू आहे. बुधवारी त्यांनी न्यूझीलंडला नमवून उपांत्य फेरीच्या आशा जीवंत ठेवल्या आहेत. उर्वरित लढतीत त्यांना अफगाणिस्तान आणि बांगलादेश यांचा सामना करायचा आहे. सध्याचा फॉर्म पाहता ते या लढतीत विजय मिळवतील अशी सर्वांनाच अपेक्षा आहे. पण, त्यांच्या उपांत्य फेरीच्या मार्गात इंग्लंडचा मोठा अडथळा आहे. पाकिस्तानने दोन्ही सामने जिंकले तरीही इंग्लंड त्यांचा पत्ता कट करू शकतो. त्यामुळे इंग्लंडचा पराभव हा त्यांच्यासाठी महत्त्वाचा आहे. इंग्लंडला उर्वरित दोन सामन्यांत भारत आणि न्यूझीलंड या तगड्या संघाचा सामना करावा लागणार आहे. यावरूनच इंग्लंडचा माजी कर्णधार नासेर हुसेन याने पाकिस्तानच्या चाहत्यांना एक प्रश्न विचारून धर्मसंकटात टाकले आहे.

पाकिस्तानने बुधवारी झालेल्या सामन्यात स्पर्धेत अपराजित असलेल्या न्यूझीलंडला पराभवाची चव चाखवली. गोलंदाजांचा अचूक मारा आणि फलंदाजांची साजेशी साथ याच्या जोरावर पाकने हा सामना 6 विकेट राखून जिंकला. शाहिन आफ्रिदीनं 3 महत्त्वाच्या विकेट्स घेत किवींना धक्का दिला, परंतु जिमी निशॅम ( 97*), कॉलिन  डी ग्रँडहोम ( 64) आणि कर्णधार केन विलियम्सन ( 41) यांनी संघाला 237 धावांचा पल्ला गाठून दिला. माफक लक्ष्याचा पाठलाग करताना पाकिस्तानचे दोन्ही सलामीवीर स्वस्तात बाद झाले. पण, बाबर आझम ( 101*) आणि हॅरिस सोहेल ( 68) यांनी दमदार खेळ करून संघाला विजय मिळवून दिला.

सध्याच्या गुणतक्त्यानुसार ऑस्ट्रेलियानं उपांत्य फेरीत आपले स्थान पक्कं केलं आहे. न्यूझीलंड 11 गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे आणि त्यांचे दोन सामने शिल्लक आहेत. भारताचे सर्वाधिक चार सामने शिल्लक आहेत आणि ते 9 गुणांसह तिसऱ्या, तर यजमान इंग्लंड 7 सामन्यांत 8 गुणांसह चौथ्या स्थानावर आहे. पाकिस्तानने बुधवारी न्यूझीलंडला नमवून 7 सात सामन्यांत 7 गुणांसह सहाव्या स्थानी आगेकूच केली आहे. पण, त्यांना इंग्लंडच्या निकालावरही अवलंबून राहावे लागणार आहे. इंग्लंडचा पुढील सामना भारताविरुद्ध होणार आहे आणि त्यावरूनच हुसेनने पाकिस्तानची कोंडी केली आहे. या सामन्यात पाकिस्तानचे चाहते कोणाला पाठिंबा देतील, अशा किचकट प्रश्न त्याने विचारला आहे.

टॅग्स :वर्ल्ड कप 2019पाकिस्तानभारतइंग्लंडन्यूझीलंड