Join us  

ICC World Cup 2019 : आयसीसीच्या 'त्या' व्हिडीओनं महेंद्रसिंग धोनीच्या निवृत्तीच्या चर्चांना पुन्हा उधाण  

ICC World Cup 2019 : भारतीय संघाची वर्ल्ड कप स्पर्धेतील वाटचाल स्वप्नपूर्तीच्या दिशेनं सुरू आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 06, 2019 11:46 AM

Open in App

लंडन, आयसीसी वर्ल्ड कप 2019 : भारतीय संघाची वर्ल्ड कप स्पर्धेतील वाटचाल स्वप्नपूर्तीच्या दिशेनं सुरू आहे. भारतीय संघाला यजमान इंग्लंड वगळता यंदाच्या स्पर्धेत कोणालाही नमवता आलेले नाही. आज अखेरच्या साखळी सामन्यात श्रीलंकेला नमवून गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावण्याचा भारतीय संघाचा निर्धार आहे. पण, भारतीय संघाच्या कामगिरीबरोबरच महेंद्रसिंग धोनीच्या निवृत्तीच्या चर्चांना उधाण आला आहे. पण, कर्णधार विराट कोहलीनं या चर्चांना पूर्णविराम लावला होता, परंतु आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनं ( आयसीसी) सोशल मीडियावर शेअर केलेल्या एका व्हिडीओमुळे पुन्हा धोनीच्या निवृत्तीची चर्चा सुरू झाली आहे.

वर्ल्ड कप स्पर्धेत धोनीला यंदा साजेशी कामगिरी करता आलेली नाही. संथ खेळीमुळे त्याच्यावर टीका होत आहे. त्यामुळेच धोनीला आजच्या सामन्यात विश्रांती देण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. धोनीला 7 सामन्यांत 223 धावा करता आल्या आहेत आणि त्यात वेस्ट इंडिजविरुद्धच्या ( 56*) एकमेव अर्धशतकाचा समावेश आहे. या वर्ल्ड कप स्पर्धेनंतर धोनीनं  सन्मानाने निवृत्ती स्वीकारावी अशी अनेकांची मागणी आहे. बीसीसीआयच्या अधिकाऱ्याने वृत्तसंस्थेशी बोलताना वर्ल्ड कपनंतर धोनी निवृत्ती स्वीकारेल, असे सांगितले होते. पण, धोनीनं शनिवारी त्यावर आपले मौन सोडले.

तो म्हणाला,''मी कधी निवृत्त होईन, याची मलाही कल्पना नाही. पण, श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यापूर्वी मी निवृत्त व्हावे, अशी अनेकांची इच्छा आहे.'' त्याने या विधानातून संघ व्यवस्थापनावर टीका केली आहे. धोनीनं निवृत्त व्हावे अशीच त्यांची इच्छा असल्याचे, अप्रत्यक्षितरित्या धोनीला सुचवायचे आहे. त्यामुळे आता धोनी विरुद्ध व्यवस्थापक असा सामना रंगण्याची शक्यता आहे. पण, आयसीसीनं शनिवारी एक व्हिडीओ शेअर केला. त्यात अनेक संघांतील खेळाडू धोनीबद्दल आपापलं मत व्यक्त करत आहेत.

धोनीच्या यशाचं रहस्य काय, सांगतोय कोहलीमहेंद्रसिंग धोनी हा सर्वोत्तम खेळाडू आहे. तो कठीण प्रसंगीही शांत राहतो आणि म्हणूनच तो योग्य निर्णय घेऊ शकतो. त्यामुळेच तो यशस्वी कर्णधार आहे, असे कोहलीनं वरील व्हिडीओत म्हटलं आहे. 

टॅग्स :वर्ल्ड कप 2019महेंद्रसिंग धोनीभारतश्रीलंका