Join us

ICC World Cup 2019 : शमी मुसलमान असल्यामुळेच करतोय अव्वल कामगिरी, पाक खेळाडूचे वादग्रस्त विधान

सोशल मीडियावर या विधानावर ताशेरे ओढले जात आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2019 22:10 IST

Open in App

लंडन, आयसीसी वर्ल्ड कप 2019 : सध्याच्या घडीला विश्वचषकात भारताकडून वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी अव्वल कामगिरी करताना दिसत आहे. जेव्हा जेव्हा भारताला विकेट्ची गरज होती, तेव्हा शमीने भारताला यश मिळवून दिले आहे. शमी हा मुसलमान असल्यामुळेच अव्वल कामगिरी करत आहे, असे वादग्रस्त विधान पाकिस्तानचे माजी क्रिकेटपटू सिकंदर बख्त यांनी केले आहे. या विधानानंतर सोशल मीडियावर बख्त ट्रोल होताना दिसत आहेत. सोशल मीडियावर त्यांच्या या विधानावर ताशेरे ओढले जात आहेत.

बख्त यांचा वक्तव्याचा खरपूस समाचार भारताचा क्रिकेटपटू लोकेश राहुलने घेतला आहे. राहुल म्हणाला की, " आमच्या संघात ज्यांची निवड होते, त्यांची फक्त भारतीय, अशीच ओळख असते. आमच्या संघात जाती-पातीवरून निवड केली जात नाही. हे सारे प्रकार पाकिस्तानमध्येच होत असतील."

टॅग्स :मोहम्मद शामीवर्ल्ड कप 2019