Join us  

ICC World Cup 2019 : सामना रद्द झाला, पण भारताला मिळाली 'ही' गोड बातमी

ही बातमी नेमकी कोणती  ते जाणून घ्या...

By ऑनलाइन लोकमत | Published: June 13, 2019 8:13 PM

Open in App

ट्रेंट ब्रिज, आयसीसी वर्ल्ड कप 2019 : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील सामन्यात अखेर पावसानेच बाजी मारली. पावसाच्या जोरदार बॅटींगमुळे अखेर सामना रद्द करावा लागला. त्यामुळे दोन्ही संघांना प्रत्येकी एक गुण देण्यात आला. पण सामना रद्द झाला असला तरी भारतासाठी एक गोड बातमी मिळाली आहे. ही बातमी नेमकी कोणती  ते जाणून घ्या...

या सामन्यापूर्वी न्यूझीलंडचा संघ सहा गुणांसह अव्वल स्थानावर होता. कारण न्यूझीलंडने यापूर्वी श्रीलंका, अफगाणिस्तान आणि बांगलादेश या संघांवर विजय मिळवला होता. त्यामुळे सहा गुणांसह न्यूझीलंड अव्वल स्थानावर होता. हा सामना न्यूझीलंडने जिंकला असता तर त्यांचे अव्वल स्थान कायम राहिले असते. पण त्यांनी जर मोठ्या फरकाने सामना गमावला असता तर त्यांचे अव्वल स्थान धोक्यात आले असते.

 

भारताने आतापर्यंत दोन्ही सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. दोन सामन्यांतील विजयासह भारतीय संघ चौथ्या स्थानावर होता. भारताने पहिल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेला पराभूत केले होते, तर दुसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियावर मात केली होती. न्यूझीलंडविरुद्धचा सामना रद्द झाल्यामुळे दोन्ही संघांना प्रत्येकी एक गुण मिळाला आहे. त्यामुळे भारताचे आता पाच गुण झाले आहेत आणि महत्वाची गोष्ट म्हणजे भारतीय संघ आता पाच गुणांसह चौथ्यावरून तिसऱ्या स्थानावर विराजमान झाला आहे. आता भारतापुढे ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड हे दोनच संघ असतील.

'या' दोन संघात होईल अंतिम सामना; गुगल गुरुंचं 'सुंदर' भाकीत विश्वचषक स्पर्धा सुरू असल्यानं सगळीकडेच क्रिकेट फिव्हर पाहायला मिळतो आहे. कोणते चार संघ उपांत्य फेरीत पोहोचणार, अंतिम सामन्यात कोण भिडणार, विश्वचषक कोण जिंकणार, याबद्दल प्रत्येकानं अंदाज वर्तवला आहे. याच पार्श्वभूमीवर गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांनीदेखील अंतिम सामन्याबद्दल भाकीत केलं आहे. एका पुरस्कार सोहळ्यात ते बोलत होते.

भारत आणि इंग्लंडमध्येविश्वचषक स्पर्धेचा अंतिम सामना होईल, असा अंदाज पिचाईंनी वर्तवला. इंग्लंडमध्ये खेळणारा भारतीय संघ उत्तम कामगिरी करत असल्याचं सुंदर पिचाईंनी म्हटलं. त्यांनी विराटसेनेला शुभेच्छादेखील दिल्या. यूएसबीआयसीनं पिचाईंचा ग्लोबल लीडरशिप सन्मानानं गौरव केला. त्यावेळी यूएसबीआयसीच्या अध्यक्षा निशा देसाईंनी काही प्रश्न विचारले. त्यात विश्वचषक स्पर्धेशी संबंधित प्रश्नांचाही समावेश होता. 

आपल्याला क्रिकेट आणि बेसबॉल आवडत असल्याचं पिचाईंनी सांगितलं. यंदा भारतानं विश्वचषक जिंकावं अशी मनोमन इच्छा असल्याचं ते म्हणाले. यंदा कोणते संघ अंतिम सामना खेळतील, असं विचारताच त्यांनी भारत आणि इंग्लंड असं उत्तर दिलं. ऑस्ट्रेलियन संघाची स्पर्धेतील कामगिरी चांगली असेल, असंदेखील ते म्हणाले. सध्याच्या गुणतालिकेवर नजर टाकल्यास इंग्लंड आणि भारताचे प्रत्येकी 4 गुण आहेत. मात्र नेट रनरेट उत्तम असल्यानं इंग्लंड भारतापेक्षा पुढे आहे. इंग्लंडनं 3 पैकी 2 सामने जिंकले आहेत. तर भारतानं 2 पैकी 2 सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. 

टॅग्स :भारतवर्ल्ड कप 2019भारत विरुद्ध न्यूझीलंड