Join us  

ICC World Cup 2019 : भारताच्या पराभवानंतर लतादीदींचा कॅप्टन कूल धोनीला सल्ला

ICC World Cup 2019 : Lata Mangeshkar tweet on MS Dhoni retirement, know what she said‏

By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2019 2:12 PM

Open in App

मुंबई : भारतीय संघाला वर्ल्ड कप स्पर्धेत उपांत्य फेरीत न्यूझीलंडकडून पराभव पत्करावा लागला. 240 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताचा संपूर्ण संघ 221 धावांत तंबूत परतला. रवींद्र जडेजा आणि महेंद्रसिंग धोनी यांनी 7 व्या विकेटसाठी केलेली 116 धावांची भागीदारी व्यर्थ ठरली. अखेर भारताला 18 धावांनी हार मानावी लागली आणि स्पर्धेतील त्यांचे आव्हानही संपुष्टात आले. या वर्ल्ड कप स्पर्धेत साजेशी कामगिरी करण्यात अपयशी ठरलेल्या महेंद्रसिंग धोनीच्या निवृत्तीची चर्चा आता जोर धरू लागली आहे. त्यातच गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी धोनीला एक सल्ला दिला आहे. 

ICC World Cup 2019 : भारताच्या पराभवावर शोएब अख्तर म्हणतो...

भारताचे आघाडीचे तीन फलंदाज अवघ्या 5 धावांत तंबूत परतले होते. हार्दिक पांड्या व रिषभ पंत यांनी संघर्ष केला, परंतु अनुभवाची उणीव आणि अतीघाई त्यांना नडली. भारताने सहा फलंदाज 96 धावांत तंबूत परतले होते. भारताचा पराभव हा डोळ्यासमोरच दिसत होता, परंतु महेंद्रसिंग धोनी व रवींद्र जडेजा यांनी 116 धावांची भागीदारी करून पुन्हा आशा पल्लवीत केल्या. पण, 48व्या षटकात जडेजा बाद झाला आणि त्यानंतर धोनी धावबाद होऊन माघारी परतला. त्यामुळे भारताला 18 धावांनी पराभव पत्करावा लागला.  

ICC World Cup 2019 : मानो या ना मानो; पण विराटसेनेचं जे झालं ते 'स्व-लिखित'च होतं!

धोनीच्या निवृत्तीवर मंगेशकर यांनी ट्विट केलं की,'' नमस्कार धोनी. मी ऐकलं की तू निवृत्ती घेण्याचा विचार करत आहेत. कृपया करून तसा विचारही करू नकोस. देशाला तुझी गरज आहे. त्यामुळे मी पुन्ही विनंती करते की निवृत्तीचा विचार मनातून काढून टाक.'' 

धोनीनं निवृत्ती घ्यायला हवी का? सचिन तेंडुलकरनं मांडलं स्पष्ट मत धोनीच्या निवृत्तीवर तेंडुलकर म्हणाला,'' तो त्याचा वैयक्तिक निर्णय असेल. त्याला निर्णय घेण्याची प्रत्येकाने मोकळीक द्यायला हवी आणि भारतीय क्रिकेटसाठी त्यानं दिलेल्या योगदानाचा आदर करायला हवा. त्यामुळे त्याच्या निवृत्तीच्या चर्चा थांबवा. देशासाठी इतकं योगदान दिल्यानंतर त्याला त्याचा निर्णय घेऊद्या.''  

Video : महेंद्रसिंग धोनीच्या 'त्या' अश्रूंनी तमाम क्रिकेट चाहत्यांच्या डोळ्यात आणलं पाणी

महेंद्रसिंग धोनीची निवृत्ती? कॅप्टन कोहलीने दिले महत्त्वाचे अपडेट्ससामन्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत कोहलीला धोनीच्या निवृत्तीबद्दल प्रश्न विचारला. त्यावर कोहली म्हणाला,''निवृत्तीच्या निर्णयाबद्दल धोनीनं अजून तरी आम्हाला काही सांगितलेले नाही.'' 

टॅग्स :वर्ल्ड कप 2019लता मंगेशकरमहेंद्रसिंग धोनीभारतन्यूझीलंड