Join us

ICC World Cup 2019 : जोफ्रा आर्चर खतरनाक... मी त्याच्यासमोर खेळणारच नाही, सांगतोय 'हा' खेळाडू

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्याच सामन्यात आर्चरने तीन विकेट्स मिळवले होते. त्याचबरोबर त्याच्या एका उसळत्या चेंडूवर हशिम अमला दुखापतग्रस्त झाला होता.

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2019 16:23 IST

Open in App

साउदम्प्टन, आयसीसी वर्ल्ड कप 2019 : क्रिकेट वर्तुळात सध्याच्या घडीला चर्चा आहे ती इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चरची. कारण इंग्लंडच्या संघात समावेश झाल्यानंतर आर्चरकडून भेदक गोलंदाजी पाहायला मिळत आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्याच सामन्यात आर्चरने तीन विकेट्स मिळवले होते. त्याचबरोबर त्याच्या एका उसळत्या चेंडूवर हशिम अमला दुखापतग्रस्त झाला होता. आता तर त्याचा सामना करायला फलंदाजही घाबरत आहेत. एका फलंदाजाने तर आर्चर हा खतरनाक गोलंदाज आहे आणि त्याचा सामना मी यापुढे करणार नाही, असे म्हटले आहे.

आर्चर हा एक असा गोलंदाज आहे की जो संथ खेळपट्टीवरही वेगवान गोलंदाजी करू शकतो. आतापर्यंत त्याने जगातील बऱ्याच नामांकित खेळाडूंना सळे की पळे करून सोडलं आहे. आयपीएलमध्ये तर आर्चरने महेंद्रसिंग धोनीलाही चकित केले होते. त्यामुळे आता विश्वचषकात तो कशी कामगिरी करतो, याकडे साऱ्यांचे लक्ष लागलेले आहे.

आर्चरचा सामना करायला प्रतिस्पर्धी नाही तर इंग्लंडच्याच संघातील खेळाडू घाबरत असल्याचे दिसत आहे. कारण नेट्समध्ये त्याच्या गोलंदाजीवर जास्त फलंदाज सराव करताना दिसत नाही. त्याचबरोबर यापुढे त्याच्या गोलंदाजीवर सराव न करण्याचा निर्णय इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू मोईन अलीने घेतला आहे.

अली म्हणाला की, " आर्चर हा भेदक मारा करतो. त्याची गोलंदाजी खेळणे फारच अवघड आहे. तो ज्यापद्धतीने वेगवान चेंडू टाकतो, ते मला पाहायला आवडेल. पण यापूढे त्याच्या गोलंदाजीचा सामना मी करणार नाही."

टॅग्स :वर्ल्ड कप 2019इंग्लंड