Join us

ICC World Cup 2019 : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यापूर्वी जसप्रीत बुमराहची 'डोप टेस्ट'! 

ICC World Cup 2019 : भारतीय संघ वर्ल्ड कप मोहिमेच्या पहिल्याच सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा सामना करणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2019 10:06 IST

Open in App

साउदम्प्टन, आयसीसी वर्ल्ड कप 2019 : भारतीय संघ वर्ल्ड कप मोहिमेच्या पहिल्याच सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा सामना करणार आहे. आफ्रिकेला वर्ल्ड कप स्पर्धेत दोन पराभवांचा सामना करावा लागला असला तरी त्यांना हलक्यात लेखण्याची चूक भारतीय संघ करणार नाही. कर्णधार विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ जेतेपदाच्या निर्धाराने मैदानात उतरणार आहे. त्यासाठी भारतीय खेळाडू कसून सरावाला लागले आहेत. विशेषतः भारतीय गोलंदाज आपला दबदबा सिद्ध करण्यासाठी तयार झाले आहेत. भारताकडे जगातील सर्वोत्तम गोलंदाज जसप्रीत बुमराह आहे. त्याच्या मदतीला भुवनेश्वर कुमार व मोहम्मद शमी हा तोफखाना आहे. त्यामुळे सध्याच्या घडीला भारताची गोलंदाजी ही सर्वात घातक मानली जात आहे.

भारतीय संघ बुधवारी वर्ल्ड कप स्पर्धेतील पहिला सामना खेळणार आहे आणि त्यांना दक्षिण आफ्रिकेचा सामना करावा लागणार आहे. या सामन्यापूर्वी बुमराहची नियमित उत्तेजक चाचणी करण्यात आली. जागतिक उत्तेजक चाचणी संघटनेच्या मान्यताप्राप्त संस्थेकडे बुमराहने ही चाचणी करून घेतली.  भारतीय खेळाडू जेव्हा जंगलात बंदुकी घेऊन घुसतात तेव्हा...वरील शिर्षक वाचून भारतीय संघ इंग्लंडमध्ये विश्वचषक खेळायला गेलाय की जंगलात शिकार करायला, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. पण ही गोष्ट आम्हीच सांगत नाही, तर दस्तुरखुद्द बीसीसीआयनेच या गोष्टीचा एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओमध्ये भारतीय खेळाडू जे काही करत आहेत, ते सुरुवातीला आपल्याला समजत नाही. पण जसजसा हा व्हिडीओ पुढे पुढे जातो, त्यानंतर आपल्याला भारतीय संघ नेमका काय करतोय, हे उलगडायला लागते.

या व्हिडीओमध्ये भारतीय खेळाडू एका जंगलात जाताना पाहायला मिळाले. भारतीय खेळाडूंनी आर्मीसारखा गणवेश परीधान केला आणि त्यानंतप बंदुकी घेऊन ते जंगलात निघाल्याचे पाहायला मिळाले. काही खेळाडू तर झाडाचा आडोसा घेत बंदुकीमधून गोळी चालवत असल्याचेही दिसले. भारतीय संघ नेमके काय करत आहे, हे मात्र यावेळी कळत नाही. पण भारताच्या काही खेळाडूंनी हे नेमकं काय होतं, याबाबत खुलासाही केला आहे.

टॅग्स :वर्ल्ड कप 2019जसप्रित बुमराहबीसीसीआय