Join us

ICC World Cup 2019 : शोएब मलिकच्या निवृत्तीवर सानिया मिर्झाचे भावनिक ट्विट!

ICC World Cup 2019 : पाकिस्तानचा अष्टपैलू खेळाडू शोएब मलिकनं शुक्रवारी आंतरराष्ट्रीय वन डे क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली.

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2019 11:16 IST

Open in App

लंडन, आयसीसी वर्ल्ड कप 2019 : पाकिस्तानचा अष्टपैलू खेळाडू शोएब मलिकनं शुक्रवारी आंतरराष्ट्रीय वन डे क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. पाकिस्तानने वर्ल्ड कप स्पर्धेतील अखेरच्या साखळी सामन्यात बांगलादेशवर 94 धावांनी विजय मिळवला. पण, या सामन्या मलिकला खेळण्याची संधी देण्यात आलेली नव्हती. संघातील सर्वात अनुभवी खेळाडू असलेला मलिक सध्या खराब कामगिरीशी झगडत आहे आणि त्यामुळेच त्याला विश्रांती देण्याचा निर्णय घेतला गेला. अखेरच्या सामन्यात खेळायला न मिळाल्याची खंत करण्यापेक्षा पुढे चालत राहण्याचा निर्धार मलिकने बोलून दाखवला होता. मलिक आता केवळ ट्वेंटी-20 क्रिकेट खेळणार आहे. मलिकच्या निवृत्तीच्या निर्णयानंतर टेनिस स्टार आणि पत्नी सानिया मिर्झाहे भावनिक ट्विट केलं.मलिक हा सध्याच्या वर्ल्ड कप स्पर्धेत 1990च्या दशकातील सक्रिय असलेला एकमेव आशियाई खेळाडू होता. तो म्हणाला,''आज मी आतंरराष्ट्रीय वन डे क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर करत आहे. ज्यांच्यासोबत मी इतकी वर्ष खेळलो त्या खेळाडूंचा, कर्णधारांचा आणि प्रशिक्षकांचे आभार.'' यंदाच्या वर्ल्ड कप स्पर्धेत 90च्या दशकातील मलिक हा एकमेव आशियाई खेळाडू खेळत होता. भारताच्या हरभजन सिंगनेही 90च्या दशकात पदार्पण केले होते, परंतु तो भारतीय संघाचा सदस्य नाही. 

ख्रिस गेल हा 90च्या दशकातील सक्रीय असलेला एकमेव खेळाडू आहे. मलिकनं 287 वन डे सामन्यांत 34.55च्या सरासरीनं 7534 धावा केल्या आहेत. पाकिस्तान संघातील सर्वाधिक धावा करणारा तो पाचवा खेळाडू आहे. शिवाय पाकिस्तानी फिरकीपटूंमध्येही सर्वाधिक विकेट घेणाऱ्यांमध्ये तो पाचवा आहे. पाकिस्तान संघात क्रमांक 1 ते 10 येथे त्याने फलंदाजी केली आहे.

मलिकच्या या निर्णयानंतर सानियानं ट्विट केलं की,''प्रत्येक कथेचा एक शेवट असतो, आयुष्यात प्रत्येक शेवटानंतर एक नवीन सुरुवात असते. देशासाठी 20 वर्ष खेळलास, हे तू अभिमानानं सांगू शकतोस. इझान आणि मलाही तुझा अभिमान वाटतो.  शोएबनं दिला पाक संघाला सल्लापाकिस्तान संघाच्या कर्णधारपदी कोणाचीही निवड केल्यास, किमान त्याला दोन वर्षांचा वेळ द्या, असा सल्ला मलिकनं दिला. 

टॅग्स :वर्ल्ड कप 2019पाकिस्तानशोएब मलिकसानिया मिर्झा