ललित झांबरे : लेगस्पिनर युजवेंद्र चहलने वन डे सामन्यात ज्या ज्या वेळी चार बळी घेतले त्या त्या वेळी भारतीय संघ जिंकला आहे. साउदम्पटन येथे त्याने आजसुद्धा दक्षिण आफ्रिकेचे ४ गडी ५१ धावांत बाद केले.
युजवेंद्रने कारकिर्दीत चार वेळा वन डे सामन्यात चार पेक्षा अधिक गडी बाद केले आहेत. त्यापैकी तीन वेळा त्याची ही कामगिरी दक्षिण आफ्रिकेविरुध्द आहे आणि वन डे सामन्यात दक्षिण आफ्रिकेविरुध्द डावात चार किंवा अधिक बळी भारतातर्फे त्यानेच सर्वाधिक वेळा घेतले आहेत. अनिल कुंबळे, सुनील जोशी, कुलदीप यादव यांनी प्रत्येकी दोन वेळा दक्षिण आफ्रिकेविरुध्द चार किंवा अधिक बळी मिळवले आहेत.
चहलने मिळवलेले चार किंवा अधिक बळी
५/२२ वि. द.आ.- सेंच्युरियन २०१८ -भारत ९ गड्यांनी विजयी
४/४६ वि. द.आ.- केपटाऊन २०१८- भारत १२४ धावांनी विजयी
६/४२ वि. आॅस्ट्रे.- मेलबोर्न २०१९- भारत ७ गड्यांनी विजयी
४/५१ वि. द.आ.- साऊदम्पटन २०१९--------------------------.
![]()