Join us

ICC World Cup 2019 : ईजा, बिजा, तिजा ठरलाच, पण चौथ्या स्थानाचाही तिढा सुटला!

ICC World Cup 2019 : आगामी वर्ल्ड कप स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा झाली आणि बऱ्याच प्रश्नांची उत्तरे मिळाली. भारतीय संघात कोणाला संधी मिळणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2019 15:37 IST

Open in App

मुंबई, आयसीसी वर्ल्ड कप 2019 : आगामी वर्ल्ड कप स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा झाली आणि बऱ्याच प्रश्नांची उत्तरे मिळाली. भारतीय संघात कोणाला संधी मिळणार? चौथ्या क्रमांकासाठी कोणाची वर्णी लागणार? महेंद्रसिंग धोनीला राखीव यष्टिरक्षक म्हणू कोण स्थान पटकावणार? असे अनेक प्रश्न क्रिकेट चाहत्यांच्या डोक्यात प्रदक्षिणा घालत होते. एमएसके प्रसाद यांच्या नेतृत्वाखालील पाच सदस्यीय निवड समिती या सर्व प्रश्नांची उत्तर दिली. त्यात सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे चौथ्या क्रमांकावर खेळणार कोण, हा होता. ते चित्र आजच्या संघ निवडीनंतर स्पष्ट झाले.संघाला गरज पडल्यास विराट कोहली चौथ्या स्थानावर उतरेल असे मत मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी व्यक्त केले होते. रोहित शर्मा आणि शिखर धवन यांच्यावर सलामीची जबाबदारी सोपवल्यानंतर कर्णधार कोहली तिसऱ्या स्थानावर येतो. पण, चौथ्या स्थानासाठी भारताकडे सक्षम पर्याय नव्हता. 2017 पासून भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने या स्थानासाठी जवळपास 11 खेळाडूंचे पर्याय वापरले. पण, वर्ल्ड कप स्पर्धा तोंडावर असतानाही भारतीय संघाला चौथ्या क्रमांकाची चिंता लागली होती. अनेकांनी अंबाती रायुडू, महेंद्रसिंग धोनी आणि केदार जाधव ही नाव पुढे केली होती. त्यात भर म्हणून रिषभ पंत, विजय शंकर, लोकेश राहुल यांचेही नावं चर्चेत होती. पण, केदार जाधवने या शर्यतीत बाजी मारली. चौथ्या स्थानासह संघात अतिरिक्त फिरकी गोलंदाज खेळवावा की चौथा जलदगती गोलंदाज, यावरची चर्चा सुरु होती. निवड समितीने यावर तोडगा काढताना रवींद्र जडेजा आणि विजय शंकर या अष्टपैलू खेळाडूंना संधी दिली आहे. लोकेश राहुलचा राखीव सलामीवीर म्हणून समावेश करण्यात आला आहे, परंतु गरज पडल्यास चौथ्या क्रमांकासाठी त्याचा विचार केला जाऊ शकतो, असेही स्पष्ट करण्यात आले. अशी असेल संघाची क्रमवारीसलामी- रोहित शर्मा व शिखर धवनमधली फळी -  विराट कोहली, केदार जाधव/ लोकेश राहुल, महेंद्रसिंग धोनी6-7 क्रमांक - हार्दिक पांड्या, विजय शंकर/ रवींद्र जडेजा/ दिनेश कार्तिकफिरकी गोलंदाज - युजवेंद्र चहल/ कुलदीप यादवजलदगती गोलंदाज - जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, भुवनेश्वर कुमार 

टॅग्स :वर्ल्ड कप २०१९विराट कोहलीलोकेश राहुलमहेंद्रसिंग धोनीरवींद्र जडेजाबीसीसीआय