Join us  

ICC World Cup 2019 : पाकिस्तानला रोखण्यासाठी टीम इंडिया मुद्दामून हरणार; माजी खेळाडूनं तोडले अकलेचे तारे

ICC World Cup 2019 : पाकिस्तान संघाने अनपेक्षित निकाल नोंदवताना उपांत्य फेरीच्या शर्यतीत आतापर्यंत स्वतःला कायम राखले आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2019 9:23 AM

Open in App

लंडन, आयसीसी वर्ल्ड कप 2019 : पाकिस्तान संघाने अनपेक्षित निकाल नोंदवताना उपांत्य फेरीच्या शर्यतीत आतापर्यंत स्वतःला कायम राखले आहे. बुधवारी झालेल्या सामन्यात पाकिस्तानने आतापर्यंत स्पर्धेत अपराजित असलेल्या न्यूझीलंडवर 6 विकेट राखून दणदणीत विजय मिळवला. त्यामुळे उपांत्य फेरीच्या त्यांच्या आशा आणखी पल्लवीत झाल्या आहेत. त्यात यजमान इंग्लंडला सलग दोन पराभवाचे धक्के बसल्यामुळे पाकिस्तानला 1992चा करिष्मा पुन्हा करण्याची स्वप्न पडू लागली आहेत. पण, भारतीय संघ असं होऊ देणार नाही. पाकिस्तानला उपांत्य फेरीत प्रवेश मिळू नये, यासाठी टीम इंडिया मुद्दामून अन्य संघांसोबत पराभव पत्करेल, असा दावा पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू बसीत अलीने केला आहे. एका पाकिस्तानी चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत अलीनं हे अकलेचे तारे तोडले.

सध्याच्या गुणतक्त्यानुसार ऑस्ट्रेलियानं उपांत्य फेरीत आपले स्थान पक्कं केलं आहे. न्यूझीलंड 11 गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे आणि त्यांचे दोन सामने शिल्लक आहेत. भारताचे सर्वाधिक चार सामने शिल्लक आहेत आणि ते 9 गुणांसह तिसऱ्या, तर यजमान इंग्लंड 7 सामन्यांत 8 गुणांसह चौथ्या स्थानावर आहे. पाकिस्तानने बुधवारी न्यूझीलंडला नमवून 7 सात सामन्यांत 7 गुणांसह सहाव्या स्थानी आगेकूच केली आहे. 

पाकसह बांगलादेश व श्रीलंका यांच्याही उपांत्य फेरीच्या आशा कायम आहेत. या दोन्ही संघांना भारताविरुद्ध खेळावे लागणार आहे आणि त्यांनी विजय मिळवल्यास पाकिस्तान स्पर्धेबाहेर होतील. यावरूनच तर्क लावताना अली म्हणाला,'' भारतीय संघाला पाकिस्तान उपांत्य फेरीत नकोय, त्यामुळे ते बांगलादेश व श्रीलंका यांच्याकडून मुद्दामून पराभूत होतील. भारताचे पाच सामने झालेले आहेत आणि पाकिस्तान उपांत्य फेरीसाठी पात्र होऊ नये, अशी त्यांची इच्छा आहे. अफगाणिस्ताविरुद्ध ते कसे खेळले हे सर्वांनी पाहिले. पाकिस्तानने या गोष्टींकडे लक्ष न देता उर्वरित सामने जिंकण्याचा निर्धार करावा.'' 

टॅग्स :वर्ल्ड कप 2019भारतपाकिस्तानन्यूझीलंड