Join us
Daily Top 2Weekly Top 5

आयसीसी वर्ल्डकप 2019 : सराव सामन्यात भारताची दैना, न्यूझीलंडपुढे 180 धावांचे आव्हान

भारताच्या एकाच फलंदाजाला तीसपेक्षा जास्त धावा करता आल्या.

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 25, 2019 18:15 IST

Open in App

लंडन, आयसीसी वर्ल्डकप 2019 : वर्ल्डकपच्या सराव सामन्यातच भारतीय संघाची दैना उडालेली पाहायल मिळाली. न्यूझीलंडच्या गोलंदाजांनी अचूक आणि भेदक मारा करत भारताचा संघ 179 धावांत सर्वबाद केला. भारताच्या एकाच फलंदाजाला तीसपेक्षा जास्त धावा करता आल्या. भारताकडून रवींद्र जडेजाने सर्वाधिक 54 धावा केल्या. न्यूझीलंडकडून वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्टने चार बळी मिळवले.

 

सराव सामन्यात भारताला न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्टने जोरदार धक्के दिल्याचे पाहायला मिळाले. बोल्टने भारताच्या रोहित शर्मा, शिखर धवन आणि लोकेश राहुल यांना बाद करत भारताचे कंबरडे मोडले.आपल्या पहिल्याच षटकात बोल्टने रोहितला पायचीत पकडत त्याला तंबूचा रस्ता दाखवला. त्यानंतर दुसरा सलामीवीर शिखर धवनलाही बोल्टने बाद केले. भारतासाठी चौथे स्थान फार महत्वाचे समजले जाते. चौथ्या स्थानावर फलंदाजीला आलेल्या लोकेश राहुलला बोल्टने सहा धावांवर बाद करत भारताला पहिले तीन धक्के दिले. विराट कोहली, दिनेश कार्तिक यांनाही मोठी खेळी साकारण्यात अपयश आले. महेंद्रसिंग धोनी आणि हार्दिक पंड्या यांनी काही काळ खेळपट्टीवर व्यतित केला खरा, पण त्यांना मोठी खेळी साकारता आली नाही.

लोकेश राहुल फेल,: भारताचा चौथ्या क्रमांकाचा तिढा कायमभारतीय संघाचा चौथ्या क्रमांकाचा तिढा अजूनही सुटलेला दिसत नाही.  वर्ल्डकप खेळण्यासाठी भारतीय संघ इंग्लंडमध्ये पोहोचला आहे. आज भारताचा न्यूझीलंडविरुद्ध सराव सामना सुरु आहे. या सराव सामन्यात लोकेश राहुलला चौथ्या स्थानावर फलंदाजीला पाठवले होते. पण राहुलला फक्त सहाच धावा करता आल्या. त्यामुळे भारताचा चौथ्या क्रमांकाचा तिढा कायम असल्याचे म्हटले जात आहे.

यापूर्वी भारताने महेंद्रसिंग धोनी, केदार जाधव, विजय शंकर, लोकेश राहुल, असे बरेच पर्याय चौथ्या स्थानासाठी प्रयोग करून पाहिले होते. पण चौथ्या स्थानावर नेमका कोण फलंदाज खेळायला हवा, याचे उत्तर मात्र अजूनही सापडलेले नाही. वर्ल्डकप सुरु होण्यापूर्वी बऱ्याच माजी क्रिकेटपटूंनी चौथ्या क्रमांकावर कोणता फलंदाज खेळायला हवा, याबाबत आपली मते व्यक्त केली होती.

 2011 साली विश्वविजयाचे सेलिब्रेशन करणारा 'तो' खेळाडू भारताच्या संघातप्रत्येक खेळाडूचे भारताकडून खेळायचे स्वप्न असते. त्याचबरोबर विश्वचषकाच्या संघात आपल्याला स्थान मिळावे आणि वर्ल्डकप जिंकून तो आपल्या हातात घेऊन उंचवावा, असे प्रत्येक खेळाडूला वाटत असते. काही जणांची स्वप्ने खरी होतात, तर काहींची स्वप्न धुळीस मिळतात. असेच एक स्वप्न त्यानेही पाहिले होते आणि आज ते सत्यात उतरले आहे. भारताने 2011 साली विश्वचषक जिंकला होता, त्यावेळी तो आपल्या मित्रांबरोबर सेलिब्रेशन करण्यात मग्न होता. पण सध्याच्या भारताच्या विश्वचषकाच्या संघात त्याने आपले स्थान निश्चित केले आहे.

आता खेळाडू नेमका कोण, हा प्रश्न तुम्हाला पडला असेल. काही दिवसांपूर्वी या खेळाडूने आपल्या ट्विटर हँडलवर एक पोस्ट केली होती. या पोस्टमध्ये या खेळाडूने आपल्या मित्रांबरोबरचा एक फोटो पोस्ट केला आहे. हा फोटो भारताने 2011 साली जेव्हा विश्वचषक जिंकला होता त्यावेळी केलेल्या सेलिब्रेशनचा आहे, असे त्याने म्हटले आहे. तो खेळाडू आहे भारताचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या.

टॅग्स :वर्ल्ड कप 2019