Join us  

ICC World Cup 2019 : भारत वर्ल्ड कपबाहेर पडल्यामुळे चाहते होतायत लखपती, पण कसे... जाणून घ्या

रविवारी दुपारी तीन वाजता वर्ल्ड कप फायनलला सुरुवात होणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2019 1:20 PM

Open in App

लंडन, आयसीसी वर्ल्ड कप 2019 : आता काही तासांवर वर्ल्ड कप फायनल येऊन ठेपली आहे. रविवारी दुपारी तीन वाजता वर्ल्ड कप फायनलला सुरुवात होणार आहे. यंदा वर्ल्ड कपमध्ये नवा विजेता पाहायला मिळणार आहे. कारण इंग्लंड आणि न्यूझीलंड या दोघांनीही आतापर्यंत एकदाही वर्ल्ड कप जिंकलेला नाही. आता या नव्या विश्वविजेत्याला पाहायला चाहत्यांना स्टेडियममध्ये जायचे आहे, त्यासाठी एका तिकीटासाठी कितीही किंमत मोजायला ते तयार आहेत.

भारतीय संघ वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये पोहोचेल, असे बऱ्याच जणांना वाटले होते. पण उपांत्य फेरीत न्यूझीलंडनेभारताला पराभूत करत अंतिम फेरीत दिमाखात प्रवेश केला. त्यामुळे भारतीय चाहते निराश झाले आहेत. बऱ्याच भारतीय चाहत्यांनी वर्ल्ड कपच्या फायनलची तिकीटं विकत घेतली होती. पण आता भारत वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये नसल्याने चाहत्यांनी तिकीटं विकायला सुरुवात केली आहे. ही तिकीट विकून भारतीय चाहते लाखो रुपये कमावत आहेत.

वर्ल्ड कपच्या फायनलची एक तिकीट आयसीसीने 295 पाऊंडला ठेवली होती, म्हणजेच  25408 रुपये एवढी त्याची किंमत होते. पण आता या तिकीटांचे भाव गगनाला भिडले आहेत. सध्याच्या घडीला एका तिकीटाची किंमत 16 हजार पाउंड म्हणजे जवळपास 13.79 लाख रुपये एवढी आहे. त्यामुळे भारतीय चाहते अंतिम फेरीतील तिकीटं विकून लखपती होताना दिसत आहेत.

भारतीय संघात दुही?; विराट-रोहितमध्ये निर्णय प्रक्रियेवरुन मतभेदविश्वचषक स्पर्धेच्या उपांत्य फेरीत पराभव पत्करावा लागल्यामुळे भारतीय संघाचं आव्हान संपुष्टात आलं. यामुळे क्रिकेट चाहते निराश झाले असताना टीम इंडियात गटबाजी होत असल्याचं वृत्त समोर आलं आहे. भारतीय कर्णधार विराट कोहली आणि उपकर्णधार रोहित शर्मा यांच्यात अनेक निर्णयांवरुन मतभेद असल्याचं वृत्त हिंदी दैनिक 'जागरण'नं दिलं आहे. टीम इंडियामध्ये सारं काही आलबेल नसून गटबाजी सुरू असल्याचं जागरणनं आपल्या वृत्तात म्हटलं आहे. 

कर्णधार कोहली आणि प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्या एककल्ली कारभारावर आणि संघ निवडीवर काही खेळाडू नाराज होते. संघाला विश्वासात न घेता कोहली आणि शास्त्रींनी निर्णय घेतले. यामुळे ड्रेसिंग रुममधील वातावरणावर आणि संघातील एकीवर परिणाम झाल्याचं वृत्तात म्हटलं आहे. संघात विराट आणि रोहित असे दोन गट पडले आहेत. विराटच्या गटातील खेळाडूंना सर्वाधिक संधी दिली जाते, संघ निवड करताना पक्षपात केला जातो, असा दावा करताना टीम इंडियातील चौथ्या क्रमांकाचा दाखला देण्यात आला आहे. चौथ्या क्रमांकासाठी विजय शंकरची निवड करण्यात आली. त्यासाठी अंबाती रायुडूला डावलण्यात आलं, असं वृत्तात नमूद करण्यात आलं आहे. 

विश्वचषक स्पर्धेदरम्यान संघाची निवड करताना मोठ्या प्रमाणात गटबाजी करण्यात आली. रोहित शर्मा आणि जसप्रीत बुमराहची कामगिरी उत्तम असल्यानं त्यांना वगळणं शक्य नव्हतं. मात्र 'विराट कंपनी'ला संधी देण्यासाठी अनेकांना डावलण्यात आलं. सातत्यानं अपयशी ठरत असूनही संघ व्यवस्थापन के. एल. राहुलच्या पाठिशी उभं राहिल्याचं 'जागरण'नं भारतीय संघातील एका खेळाडूच्या हवाल्यानं म्हटलं आहे. कुलदीप यादवऐवजी अनेकदा युझवेंद्र चहलला संधी देण्यात आली. चहल आयपीएलमध्ये विराटच्या नेतृत्त्वाखालील रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुकडून खेळतो. 

टॅग्स :वर्ल्ड कप 2019भारतइंग्लंडन्यूझीलंड