Join us  

ICC World Cup 2019, IND vs NZ : भारत-न्यूझीलंड सामना होणार, पावसाची शक्यता 40 टक्क्यानं कमी झाली

ICC World Cup 2019, IND vs NZ : पावसाच्या लहरी स्वभावाची अनुभूती केवळ भारतीयांनाच नव्हे, तर नॉटिंगहॅम येथेही अनुभवायला मिळत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 13, 2019 11:11 AM

Open in App

ट्रेंट ब्रिज, आयसीसी वर्ल्ड कप 2019, भारत वि. न्यूझीलंड : पावसाच्या लहरी स्वभावाची अनुभूती केवळ भारतीयांनाच नव्हे, तर नॉटिंगहॅम येथेही अनुभवायला मिळत आहे. नॉटिंगहॅम येथील ट्रेंट ब्रिज येथे आज वर्ल्ड कप स्पर्धेतील भारत आणि न्यूझीलंड सामना होणार आहे. या सामन्यावर पावसाचे सावट असल्याची चर्चा गेले दोन दिवस रंगत आहे आणि आजच्या हवामानाचा अंदाज घेतल्यास पाऊसच हावी होईल, असे चित्र आहे. पण, नुकत्याच आलेल्या अंदाजानुसार पावसाने आपला मूड बदलला आहे आणि पाऊस पडण्याची शक्यता 40 टक्क्यांनी कमी झाली आहे. त्यामुळे भारत आणि न्यूझीलंड या बलाढ्य संघांमधला सामन्याचा आनंद सध्याच्या हवामानाच्या अंदाजानुसार तरी तुटता येणार आहे.

विराट कोहलीला खुणावतोय सचिन तेंडुलकरचा आणखी एक विक्रमभारत आणि न्यूझीलंड यांच्यात वर्ल्ड कप स्पर्धेत आज होणाऱ्या लढतीवर पावसाचे सावट आहे. जर हा सामना झालाच, तर भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीला मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडण्याची संधी आहे. कोहलीची प्रत्येक खेळी ही कोणता ना कोणता तरी विक्रम मोडणारी ठरते, त्यात त्याच्या विक्रमाची तुलना तेंडुलकरशी केली जाते. त्यामुळे किवींविरुद्ध 57 धावा केल्यास कोहली तेंडुलकरच्या आणखी एका विक्रमाला गवसणी घालणार आहे. 

कोहलीला वन डे क्रिकेटमध्ये 11000 धावा पूर्ण करण्यासाठी 57 धावांची आवश्यकता आहे. कोहलीच्या नावावर सध्या 221 डावांत 10943 धावा आहेत आणि वन डे क्रिकेटमध्ये सर्वात जलद 10000 धावा करण्याचा विक्रम त्याचा नावावर आहे. जर न्यूझीलंडविरुद्ध त्यानं 57 धावा केल्यास तर 11 वर्षांहून कमी कालावधीत हा पल्ला गाठणारा कोहली हा पहिलाच फलंदाज ठरेल. वन डे क्रिकेटमध्ये 11000 धावा करणारा तो तिसरा भारतीय फलंदाज ठरणार आहे. यापूर्वी सचिन तेंडुलकर आणि सौरव गांगुली यांनी हा पल्ला पार केला आहे.

याशिवाय कोहलीला न्यूझीलंडविरुद्ध सर्वाधिक शतक करणाऱ्या वीरेंद्र सेहवाग व रिकी पाँटिंग यांच्या विक्रमाशी बरोबरी करण्याचीही संधी आहे. शिवाय न्यूझीलंडविरुद्ध सर्वाधिक धावा करणाऱ्या भारतीय फलंदाजांत दुसऱ्या स्थानी झेप घेण्याचा विक्रमही त्याला खुणावत आहे. सेहवागनं किवींविरुद्ध 23 डावांत 1157 धावा केल्या आहेत, तर तेंडुलकरच्या नावावर 1750 धावा आहेत. कोहलीनं 19 डावांत 1154 धावा केल्या आहेत. 

टॅग्स :वर्ल्ड कप 2019भारतन्यूझीलंड