ICC World Cup 2019 : ... तर भारत ठरू शकतो उपांत्य फेरीत आऊट, हा आहे धोका

रताचा फॉर्म पाहता ते विश्वविजेते ठरतील, असं बऱ्या जणांना वाटत आहे. पण भारतीय संघात काही कच्चे दुवे आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 4, 2019 05:39 PM2019-07-04T17:39:56+5:302019-07-04T17:40:52+5:30

whatsapp join usJoin us
ICC World Cup 2019: ... if India can out of the semi-finals, this is the risk | ICC World Cup 2019 : ... तर भारत ठरू शकतो उपांत्य फेरीत आऊट, हा आहे धोका

ICC World Cup 2019 : ... तर भारत ठरू शकतो उपांत्य फेरीत आऊट, हा आहे धोका

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

लंडन, आयसीसी वर्ल्ड कप 2019 : भारतीय संघ उपांत्य फेरीत दाखल झाला आहे. भारताचा फॉर्म पाहता ते विश्वविजेते ठरतील, असं बऱ्या जणांना वाटत आहे. पण भारतीय संघात काही कच्चे दुवे आहेत. त्यामुळेच भारत उपांत्य फेरीत आऊट होऊ शकतो, एका विश्वविजेत्या कर्णधारांनी सांगितले आहे.

Image result for kohli upset

भारताचा उपांत्य फेरीत सामना इंग्लंड किंवा न्यूझीलंडशी होईल, असे म्हटले जात आहे. भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील साखळी सामन्यात पाऊस पडला होता. त्यामुळे या दोन्ही संघांना प्रत्येकी एक गुण देण्यात आला होती. दुसरीकडे भारताला इंग्लंडने पराभूत केले होते. त्यामुळे आता उपांत्य फेरीत भारत विजयी ठरणार का, याकडे साऱ्यांचे लक्ष लागून राहिलेले आहे.

Image result for kohli upset

वेस्ट इंडिजचे माजी विश्वविजेते कर्णधार क्लाइव्ह लॉइड यांनी सांगितले की, " भारतीय संघाची कामगिरी आतापर्यंत चांगली झाली आहे. पण भारताचे आता कच्चे दुवेही समोर आले आहेत. भारतीय संघाच्या जास्त धावा पहिल्या तीन फलंदाजांनी केल्या आहेत, ही एका प्रकारे चांगली गोष्ट म्हटली जात आहे, पण हा धोकाही आहे."

Image result for kohli upset

लॉइड पुढे म्हणाले की, " आतापर्यंत भारताच्या मधल्या फळीतील फलंदाजांना लौकिकाला साजेशी कामगिरी करता आलेली नाही. त्याचबरोबर तळाच्या फलंदाजांनाही उपयुक्त फलंदाजी करता आलेली नाही. त्यामुळे भारताचे पहिले तीन फलंदाज झटपट बाद झाले तर ते अडचणीत येऊ शकतात आणि हेच त्यांच्या पराभवाचे कारण ठरू शकते."

Related image

सचिन तेंडुलकरची भविष्यवाणी ठरली खरी, आता विश्वविजेत्याचे नाव सांगणार
भारताचा माजी महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरने विश्वचषकापूर्वीच भविष्यवाणी केली होती. विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत कोण संघ पोहोचणार, हे सचिनने विश्वचषकापूर्वीच सांगितले होते आणि ती भविष्यवाणी आता खरी ठरलेली पाहायला मिळते आहे. सचिनने विश्वचषकापूर्वीच ऑस्ट्रेलिया, भारत, इंग्लंड हे तीन संघ उपांत्य फेरीत पोहोचणार, असे म्हटले होते. चौथ्या स्थानासाठी सचिनने न्यूझीलंड आणि पाकिस्तान या दोन संघाचे नाव घेतले होते. सचिनची भविष्यवाणी आता खरी ठरलेली पाहायला मिळत आहे. आता विश्वचषक कोणता संघ जिंकणार, याची भविष्यवाणी सचिन कधी करतो, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिलेले आहे.

ICC World Cup 2019 : When Google CEO Sundar Pichai

Web Title: ICC World Cup 2019: ... if India can out of the semi-finals, this is the risk

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.