Join us  

ICC World Cup 2019 : संजय मांजरेकरची कॉमेंट्री नको रे बाबा... नेटिझन्सने घेतला धसका

ICC World Cup 2019 : इंग्लंडकडून झालेल्या पराभवानंतर भारतीय संघाने आपली कामगिरी उंचावताना मंगळवारी बांगलादेशला नमवून उपांत्य फेरीत प्रवेश केला.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 03, 2019 3:37 PM

Open in App

लंडन, आयसीसी वर्ल्ड कप 2019 : इंग्लंडकडून झालेल्या पराभवानंतर भारतीय संघाने आपली कामगिरी उंचावताना मंगळवारी बांगलादेशला नमवून उपांत्य फेरीत प्रवेश केला. याही सामन्यात महेंद्रसिंग धोनीचा संथ खेळ चर्चेचा विषय ठरला. भारतीय संघाच्या 315 धावांचा पाठलाग करताना बांगलादेशला 29 धावा कमी पडल्या. रोहित शर्माचा झेल सोडणं बांगलादेशला महागात पडले. रोहितनं 104 धावांची खेळी केली. त्यानंतर जसप्रीत बुमराहनं भेदक गोलंदाजी करताना भारताला विजय मिळवून दिला.

पण, या सामन्यात भारतीय चाहत्यांना एक गोष्ट आवडली नाही आणी ती म्हणजे संजय मांजरेकरची कॉमेंट्री... वर्ल्ड कप स्पर्धेदरम्यान मांजरेकरच्या कॉमेंट्रीवर अनेकांनी नाराजी प्रकट केली आहे. सोशल मीडियावर तर मांजरेकरवर सडकून टीका झाली. त्यात भर म्हणून मांजरेकरने कॅप्टन कूल महेंद्रसिंग धोनीवर टीका केली. त्यानंतर तर नेटिझन्सने मांजरेकरचा चांगलाच समाचार घेतला.

थोड्याच वेळात मांजरेकरवर नेटिझन्सनी टीकांचा पाऊस पाडला.  

टॅग्स :वर्ल्ड कप 2019भारतबांगलादेश