ICC World Cup 2019 : ... अन् विराट त्या लहान मुलाकडे पाहतच राहीला, पाहा हा व्हिडीओ...

विराट त्या लहान मुलाकडे बघून हसत होता.

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2019 19:44 IST2019-06-29T19:43:00+5:302019-06-29T19:44:34+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
ICC World Cup 2019: ... and the Virat Kohli looking at that little boy, see the video ... | ICC World Cup 2019 : ... अन् विराट त्या लहान मुलाकडे पाहतच राहीला, पाहा हा व्हिडीओ...

ICC World Cup 2019 : ... अन् विराट त्या लहान मुलाकडे पाहतच राहीला, पाहा हा व्हिडीओ...

लंडन, आयसीसी वर्ल्ड कप 2019 : भारताचा कर्णधार विराट कोहली हा एक व्यावसायिक क्रिकेटपटू आहे. पण कधी कधी तो भावुक झालेलाही पाहायला मिळतो. भारताचा रविवारी इंग्लंडबरोबर सामना होणार आहे. पण या सामन्याच्या पूर्वसंध्येला विराट एका मुलाकडे पाहतच राहिल्याचे साऱ्यांनी बघितले. विराट त्या लहान मुलाकडे बघून हसत होता. पण तो मुलगा नेमका होता तरी कोण...


सामन्याच्या पूर्वसंध्येला पत्रकार परिषद आयोजित केली होती. त्यावेळी पत्रकार परिषदेचा मीडिया मॅनेजर म्हणून एका लहान मुलाला बनवण्यात आले होते. या लहानग्याने आपले भाषण जेव्हा सुरु केले तेव्हा कोहली त्याच्याकडे पाहून आवाक झाला. त्यानंतर त्याचे पाठांतर पाहून कोहलीने स्मित केले आणि तो आपल्या जागेवर जाऊन बसला.

Image result for kohli laughing

भारत-इंग्लंड सामन्यात पाऊस घालणार का खोडा; जाणून घ्या...
भारत आणि इंग्लंड यांच्यातील निर्णयाक सामना उद्या होणार आहे. या सामन्यातील विजयामुळे दोन्ही संघांचे भविष्य बदलू शकते. कारण इंग्लंडने जर हा सामना गमावा तर त्यांचे या स्पर्धेतील आव्हान संपुष्टात येऊ शकते. दुसरीकडे हा सामना जिंकून उपांत्य फेरीतील स्थान निश्चित करण्यासाठी भारताचा संघ उत्सुक असेल.

Image result for kohli laughing

सध्याच्या घडीला भारत हा गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर आहे. भारताने सामना सामन्यांमध्ये पाच सामने जिंकले आहेत. भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील सामना पावसामुळे रद्द करावा लागला होता. त्यामुळे भारताला एका गुणावर समाधान मानावे लागले होते. त्यामुळे भारताचे सध्याच्या घडीला 11 गुण आहेत. त्यामुळे हा सामना जर भारताने जिंकला तर 13 गुणांसह ते उपांत्य फेरी गाठू शकतात.

Related image

इंग्लंडचा संघ विश्वचषकाच्या सुरुवातीला अव्वल स्थानावर विराजमान होता. पण आता इंग्लंडचा संघ उपांत्य फेरीत पोहोचू शकणार की नाही, याबाबत संदिग्धता आहे. कारण इंग्लंड आतापर्यंत सात सामने खेळला आहे. या सात सामन्यांमध्ये इंग्लंडने चार सामने जिंकले आहेत, तर तीन सामन्यांमध्ये त्यांना पराभव पत्करावा लागला होता. त्यामुळे इंग्लंडचा संघ सध्या आठ गुणांसह चौथ्या स्थानावर आहे. पण इंग्लंडने जर उर्वरीत दोन सामन्यांपैकी एक जरी सामना गमावला तर त्यांचे आव्हान संपुष्टात येऊ शकते.

भारत आणि इंग्लंड यांच्यातील सामन्यात जर पाऊस पडला तर दोन्ही संघांना एक गुण मिळू शकतो. पण त्यामुळे इंग्लंडचे या स्पर्धेतील आव्हान धोक्यात येऊ शकते. त्यामुळे या सामन्यात पाऊस पडणार की नाही, याची उत्सुकता चाहत्यांना असेल.

भारत आणि इंग्लंड यांच्यातील सामन्यात पाऊस पडण्याची शक्यता कमी आहे. रविवारी पूर्ण दिवस चांगला सूर्यप्रकाश असेल, त्याचबरोबर तापमान 26 अंश असू शकते. त्यामुळे या सामन्यात जास्त धावा पाहायला मिळातील, असे म्हटले जात आहे.

Web Title: ICC World Cup 2019: ... and the Virat Kohli looking at that little boy, see the video ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.