Join us  

ICC World Cup 2019 : पाऊस थांबल्यावर पंचांनी केली मैदानाची पाहणी, अन्...

पंचांनी पाहणी केल्यावर आता काही वेळातच सामना सुरु होईल, असे चाहत्यांना वाटतले, पण...

By ऑनलाइन लोकमत | Published: June 13, 2019 6:06 PM

Open in App

ट्रेंट ब्रिज, आयसीसी वर्ल्ड कप 2019 : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील सामन्यात पावसाने काही काळ विराम घेतला. त्यामुळे पंचांनी मैदानाची पाहणी केली. पीच वगळता मैदानावरील सर्व कव्हर्स काढण्यात आली. त्यानंतर दोन्ही पंचांनी मैदानाची पाहणी केली. मैदानाच्या काही भागात थोडा चिखल झाला होता. त्याबरोबर मैदान निसरडे झाल्याचे पाहायला मिळाले. पंचांनी पाहणी केल्यावर आता काही वेळातच सामना सुरु होईल, असे चाहत्यांना वाटतले, पण...

दोन्ही पंच मैदानात आले तेव्हा पाऊस पूर्णपणे थांबला होता. दोन्ही पंचांनी संपूर्ण मैदान पाहिले. त्यावेळी मैदानातील काही भागांतील पाणी अजूनही साफ करण्यात आले नव्हते. त्याचबरोबर मैदानात चालतानाही पंचांना समस्या जाणवत होती. आता ग्राऊंडस्टाफ या परिस्थितीला कसे सामोरे जातो, याची उत्सुकता चाहत्यांना आहे.

 

पंचांनी मैदानाची पाहणी केली आणि त्यानंतर थोड्याच वेळात पुन्हा एकदा पावसाने हजेरी लावली. त्यामुळे कव्हर्स पुन्हा आणावे लागले आणि पुन्हा एकदा सामना सुरु होणे लांबणीवर पडले.

 

टॅग्स :वर्ल्ड कप 2019भारतन्यूझीलंड