ICC World Cup 2019: फिंचच्या शतकानंतरही ऑस्ट्रेलियाचा डाव गडगडला; इंग्लंडपुढे 286 धावांचे आव्हान

मजबूत पाया रचूनही ऑस्ट्रेलियाच्या मधल्या फळीला त्यावर कळस चढवता आला नाही.

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2019 18:36 IST2019-06-25T18:31:19+5:302019-06-25T18:36:10+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
ICC World Cup 2019: After a century of Aaron Finch Australia's innings collapsed; England needed 286 runs to win | ICC World Cup 2019: फिंचच्या शतकानंतरही ऑस्ट्रेलियाचा डाव गडगडला; इंग्लंडपुढे 286 धावांचे आव्हान

ICC World Cup 2019: फिंचच्या शतकानंतरही ऑस्ट्रेलियाचा डाव गडगडला; इंग्लंडपुढे 286 धावांचे आव्हान

लंडन, आयसीसी वर्ल्ड कप 2019 : शतकी सलामी नंतर ऑस्ट्रेलियाचा संघ साडे तिनशे धावांचा टप्पा गाठेल, असे बऱ्याच जणांना वाटत होते. पण फिंचच्या शतकानंतर ऑस्ट्रेलियाचा डाव गडगडला आणि त्यांना 285 धावांवर समाधान मानावे लागले.



 

इंग्लंडने नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलियाला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केले. या गोष्टीचा फायदा फिंच आणि डेव्हिड वॉर्नर यांनी चांगलाच उचलला. या दोघांनी १२३ धावांची सलामी देत इंग्लंडच्या गोलंदाजीची हवा काढून टाकली. पण त्यानंतर वॉर्नर ५३ धावांवर बाद झाला आणि ही जोडी फुटली. त्यानंतर काही वेळात फिंचने शतक झळकावले. फिंचने ११ चौकार आणि दोन षटकारांच्या जोरावर १०० धावा केल्या, पण शतकानंतर त्याला एकही धाव करता आली नाही.


फिंच बाद झाला तेव्हा ऑस्ट्रेलियाची ३६ षटकांमध्ये ३ बाद १८५ अशी स्थिती होती. यावेळीही ऑस्ट्रेलियाचा संघ साडे तिनशे धावांच्या जवळपास जाईल, असे वाटत होते. पण फिंच बाद झाल्यावर मात्र ऑस्ट्रेलियाचा डाव गडगडला आणि त्यांना तिनशे धावांचा टप्पाही गाठता आला नाही.



 

दमदार सलामीनंतर ऑस्ट्रेलियाला स्टीव्हन स्मिथ, ग्लेन मॅक्सवेल, उस्मान ख्वाजा यांच्याकडून ऑस्ट्रेलियाला मोठी अपेक्षा होती. कारण सलामीवीरांनी मोठ्या धावसंख्येचा मजबूत पाया रचला होता. पण मजबूत पाया रचूनही ऑस्ट्रेलियाच्या मधल्या फळीला त्यावर कळस चढवता आला नाही.



 

Web Title: ICC World Cup 2019: After a century of Aaron Finch Australia's innings collapsed; England needed 286 runs to win