Join us  

ICC World Cup 2019 : 5 की 6 धावा? बेन स्टोक्सच्या ओवर थ्रो प्रकरणावर आयसीसीनं सोडलं मौन

ICC World Cup 2019 : वर्ल्ड कप स्पर्धेच्या अंतिम सामन्यात निकाल न लागता केवळ चौकारांच्या आधारावर इंग्लंडला जेतेपद देण्यात आले.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2019 1:28 PM

Open in App

लॉर्ड्स, आयसीसीवर्ल्ड कप 2019 :वर्ल्ड कप स्पर्धेच्या अंतिम सामन्यात निकाल न लागता केवळ चौकारांच्या आधारावर इंग्लंडला जेतेपद देण्यात आले. निर्धारित 50-50 षटकं आणि सुपर ओव्हर यांच्यातही सामना बरोबरीत सुटला होता. पण, सर्वाधिक चौकारांच्या जोरावर इंग्लंडला विजयी घोषित करण्यात आले. क्रिकेट चाहत्यांना आयसीसीचा हा नियम काही पटलेला नाही. या व्यतिरिक्त अंतिम सामन्यात अंपायर कुमार धर्मसेना यांनी दिलेला एक निर्णयावरही टीका होत आहे

नेमकं काय घडलं?इंग्लंडला अखेरच्या तीन चेंडूंत 9 धावांची गरज होती. ट्रेंट बोल्टने टाकलेला फुलटॉस चेंडू बोल्टनं डीप मिड विकेटच्या दिशेनं टोलावला. पण, मार्टिन गुप्तीलनं तो चेंडू यष्टिरक्षकाच्या दिशेनं फेकला आणि दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नात असलेल्या स्टोक्सच्या बॅटीला लागून चेंडू सीमारेषेबाहेर गेला. कुमार धर्मसेनानं सहकारी पंचांशी चर्चा करून इंग्लंडला सहा धावा देण्यात आल्या. त्यानंतर हे समीकरण 2 चेंडूंत 3 धावा असे झाले आणि इंग्लंडने सामना बरोबरीत सोडवला.  

नियम काय सांगतो?आयसीसीच्या नियम 19.8 नुसार इंग्लंडला देण्यात आलेल्या सहा धावा या चुकीच्या ठरतात. त्यांना पाच धावा मिळायला हव्या होत्या. ओव्हर थ्रोमुळे किंवा क्षेत्ररक्षकाच्या चुकीच्या कृतीमुळे चेंडू सीमारेषेबाहेर गेल्यास धावून घेतलेल्या धावा आणि चार अशा मिळून धावा दिल्या जातात. पण, थ्रो होण्यापूर्वी फलंदाजांनी खेळपट्टीचा मध्यभाग तरी पार करायला हवा. या नियमामुळेच थोडासा संभ्रम निर्माण होत आहे. जेव्हा गुप्तीलने थ्रो केला त्यावेली स्टोक्स व आदिल रशीद यांनी खेळपट्टीचा मध्यभागही ओलांडलेला नव्हता. त्यावरून हे स्पष्ट दिसते की इंग्लंडला पाचच धावा मिळायला हव्या होत्या. तसे झाले असते तर न्यूझीलंडने एका धावेने जेतेपद पटकावले असते. मग सुपर ओव्हर घेण्याचीही गरज भासली नसती. 

आयसीसीचं म्हणणं काय?''मैदानावर हजर असलेल्या अंपायर्सनी त्यांना नियमातून समजलेल्या व्याख्यानुसार तो निर्णय दिला. त्यामुळे आम्ही त्यावर कोणतीही प्रतिक्रिया देऊ शकत नाही,'' असे आयसीसीकडून सांगण्यात आले.  

गुप्तीलनं थ्रो केला तेव्हा इंग्लंडचे फलंदाज कुठे होते, ते पाहा...

आयसीसीकडून देण्यात येणारा सर्वोत्तम अंपायरचा पुरस्कार पाचवेळा नावावर करणारे आणि मेरिलबन क्रिकेट क्लबच्या नियमांसंबंधित उपसमितीचे सदस्य सायमन टॉफेल यांनीही हा निर्णय दुर्दैवी असल्याचे म्हटले आहे. 

पाहा व्हिडीओ

टॅग्स :वर्ल्ड कप 2019बेन स्टोक्सइंग्लंडन्यूझीलंडआयसीसी