लंडन, आयसीसी वर्ल्ड कप 2019 : वेस्ट इंडिजकडून पहिल्याच सामन्यात लाजीरवाणा पराभव पत्करणाऱ्या पाकिस्तान संघाने वर्ल्ड कप स्पर्धेत सोमवारी कमाल केली. बेभरवशी पाकिस्तान संघाने यजमान इंग्लंडला पराभूत करून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. या सामन्यात इंग्लंडने सर्वाधिक 6 वेळा 300+ धावा करण्याच्या ऑस्ट्रेलियाच्या विक्रमाशी बरोबरी केली, परंतु त्याचवेळी एक लाजिरवाणा विक्रमही नावावर केला. या सामन्यात इंग्लंडला 14 धावांनी पराभव पत्करावा लागला.
पाकिस्तानने रचला नवा विक्रमपहिल्या सामन्यात तोंडघशी पडलेल्या पाकिस्तानने दुसऱ्या सामन्यात मात्र तिनशे धावांचा पल्ला गाठला. हा पल्ला गाठताना पाकिस्तानने एक नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. या सामन्यात पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करताना ३४९ धावा केल्या. पण या सामन्यात पाकिस्तानच्या एकाही फलंदाजाला शतक झळकावता आले नाही. एकाही खेळाडूने शतक न झळकावता पाकिस्तानने सर्वोच धावसंख्या रचण्याचा विक्रम विश्वचषकात प्रस्थापित केला आहे. कारण विश्वचषकात एकही शतक न झळकावता झालेली ही सर्वोच्च धावसंख्या आहे. यापूर्वी हा विक्रम दक्षिण आफ्रिकेच्या नावावर होता.
दक्षिण आफ्रिकेने 2015 साली झालेल्या विश्वचषकात युएई संघाविरुद्ध एकही शतक न झळकावता 341 धावा केल्या होत्या. दक्षिण आफ्रिकेनंतर हा विक्रम पाकिस्तानच्याच नावावर होता आणि तो या विश्वचषकातच झाला होता. पाकिस्तानने 2015 साली झालेल्या विश्वचषकात युएई संघाविरुद्धच एकही शतक न झळकावता 339 धावा केल्या होत्या.
एकही शतक न झळकावता विश्वचषकात झालेल्या सर्वाधिक धावा348/8 पाकिस्तान विरुद्ध इंग्लंड, नॉटिंगहॅम, 2019341/6 दक्षिण आफ्रिका विरुद्ध युएई, वेलिंगटन, 2015339/6 पाकिस्तान विरुद्ध युएई, नेपिअर, 2015338/5 पाकिस्तान विरुद्ध श्रीलंका, स्वेस्निया, 1983